‘ या ‘ ठिकाणी असेल तीळ तर लग्नाला होऊ शकतो विलंब ? जाणून घ्या भविष्याबद्दलचे संकेत..

हाताच्या रेषा, आकारा व्यतिरिक्त शरीरावर असलेली खूण व तीळ अनेक संकेत देतात. हे शुभ किंवा अशुभ असे दोन्हीही असू शकतात. तर आज आपण बोलूया हातावरील तीळाबद्दल. हे तीळ पैशांव्यतिरिक्त, नोकरी-व्यवसाय आणि सामजिक प्रतिष्ठा सारख्या पैलूंचा विचार करून भविष्या बद्दल संकेत देते.

लहान बोटावर असलेले तीळ – लहान बोटावर तीळ असणे अत्यंत शुभ मानले जाते. असे लोक पैशांच्या बाबतीत खूप नशीबवान असतात आणि त्यांच्याकडे कधीच पैशांची कमतरता रहात नाही. मात्र या लोकांच्या आयुष्यात दुसऱ्या अडचणी येत राहतात.

मधल्या बोटावर असलेले तीळ – मधल्या बोटावर तीळ असणे हे व्यक्तीला भाग्यशाली बनवते. या लोकांच्या आयुष्यात सुख व संपत्ती दोन्ही असते.

मधल्या बोटाच्या खाली असलेले तीळ – मधल्या बोटावर असलेले तीळ सुख व संपत्ती देते मात्र त्याच बोटाच्या खाली तीळ असणे अपयशाचे संकेत देते. मधल्या बोटाच्या खालचा भाग शनी पर्वत म्हणून ओळखला जातो.

अनामिका बोटाच्या खाली असलेले तीळ – अनामिका बोटाच्या खाली असलेले तीळ सामाजिक, सरकाराशी संबंधित कामांमध्ये आणि नोकरीच्या क्षेत्रातील अडचणींबद्दल इशारा देते. यामुळे व्यक्तीला ठेस लागण्याची किंवा खोटेपणामुळे नोकरी वरून काढून टाकण्याचे योग बनतात. अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात पोलिस स्टेशनाच्या व न्यायालयाच्या चकरा माराव्या लागू शकतात.

चंद्र पर्वतावर असलेले तीळ – हातावर चंद्र पर्वतावर तीळ असणे हे मानसिक अस्थिरतेचे संकेत देते. हातावर या ठिकाणी तीळ असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या चिंता त्रास देत राहतात. अशा लोकांना प्रेमात अपयश मिळू शकते आणि त्यांच्या लग्नाला देखील उशीर होऊ शकतो. हा तीळ व्यक्तीच्या आईच्या आरोग्यासाठी देखील चांगला नसतो.

Leave a Reply

Your email address will not be published.