तुम्हाला देखील दिसत आहेत असे संकेत ?? तर समजून जा प्रत्येक कामात मिळणार यश..

आपल्याला कधी कधी वेगळेच वाटते किंवा काही संकेत मिळतात. मात्र आपण त्यावर लक्ष देत नाही परंतु हे संकेत आपल्याला बरच काही सांगतात. काही संकेत आपल्या आयुष्यात येणाऱ्या शुभ व अशुभ काळाचे देखील संकेत देतात. असेच काही संकेत आहेत ज्यांच्या पासून हे समजते की आता सर्व काही चांगले होणार आहे. चला जाणून घेऊया..

जर तुम्ही कोणत्या कामासाठी बाहेर जात असाल आणि तुमच्यासमोर दुधाने भरलेले पात्र दिसले, तर समजून जा की तुमचे काम पूर्ण होऊन जाणार आहे. तुमचा दिवस चांगला जाईल. अशाच प्रकारे जर बाहेर जाताना पाण्याने भरलेले भांडे घेऊन जर कोणी तुमच्या समोरून गेले तरी देखील दिवस चांगला जातो आणि कामात यश मिळते.

जर माकड तुमच्या घरावर आंब्याची कोय फेकत असेल तर हे शुभ मानले जाते. जर एखादा पक्षी चांदीची वस्तू फेकून जात असेल तर त्याला शुभ मानले जाते.

मुलांना देवाचे स्वरूप मानले जाते जर घराच्या बाहेर निघत्यावेळी किंवा सकाळी झोपून उठल्यावर एखाद्या लहान मुलाचा व मुलीचा हसताना चेहरा जर तुमच्या समोर आला तर तुमचा दिवस खूप चांगला जातो. सकाळी उठून गायीला आपल्या वासऱ्याला दूध पाजताना बघणे देखील अत्यंत शुभ असते.

जर तुम्ही सकाळी उठून आपल्या चेहऱ्याला आरशात बघता तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर इतर दिवसांपेक्षा जास्त चमक दिसते. तर याचा अर्थ असा होता की तुमच्या चांगल्या काळाची सुरुवात झाली आहे.

जर सकाळी घराच्या बाहेर जाताना पैसे मिळाले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते. अशाच प्रकारे संध्याकाळच्या वेळी नाणे भेटणे हे संकेत देतात की देव तुमच्या सोबत आहे. मात्र या नाण्याला दान करून द्यावे किंवा मंदिरात ठेऊन द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.