नोकरी, व्यवसायात प्रगती, धन-संपत्ती, आरोग्य, सुख-शांती सारख्या अनेक पैलूंचा संबंध घराच्या वास्तुशी देखील संबंध असतो. घरात ठेवलेल्या वस्तू जिथे काही प्रकरणात शुभ असतात तर काही प्रकरणात अशुभ देखील असतात. आज त्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया ज्या वास्तूदोषाचे कारण बनतात.
देवी-देवतांची तुटलेली मूर्ती – शास्त्रानुसार देवी-देवतांच्या मूर्ती व चित्रांमधून सकारात्मक ऊर्जा निघते. मात्र त्या जर तुटल्या तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तर जुन्या व तुटलेल्या मूर्त्यांना जमिनीत पूरले पाहिजे किंवा पाण्यात प्रवाहित केल्या पाहिजे.
बंद घड्याळ – बंद घड्याळ तुमच्या चांगल्या वेळेला वाईट वेळेत बदलवू शकते. म्हणून घरी बंद पडलेले घड्याळ ठेवले नाही पाहिजे. बंद घड्याळ सौभाग्यात कमतरता आणते. सोबतच वाईट घटना संपवत नाही.
बंद कुलूप – बंद घड्याळासारखे बंद कुलूप देखील अशुभ असते. घरात कधीही बंद किंवा खराब कुलूप ठेवले नाही पाहिजेत. घरात बंद कुलूप ठेवल्याने कारकिर्दीत अडचणी येतात आणि लग्नासाठी देखील विलंब होतो.
खराब चप्पल व बूट – बुट व चप्पल यांच्या संबंध संघर्षाशी जोडलेला असतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यात संघर्ष कमी असावा तर नेहमी स्वच्छ व चांगले चप्पल, बूट घातले पाहिजे.
जुने फाटलेले कपडे – कपड्यांचा संबंध भाग्याशी असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ आणि न फाटलेले कपडे घातले पाहिजे.