झोपण्याअगोदर जाणून घ्या हे झोपेचे नियम, नकळत करू नका अशी चूक की ज्यामुळे करावी लागेल नुकसान भरपाई !

दिवसभराच्या थकलेल्या शरीराला रात्री आराम देणे खूप गरजेचे असते, मात्र चांगल्या झोपेबरोबरच हे देखील महत्त्वाचे आहे की त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे. हिंदूधर्म शास्त्रात आणि विशेषत: वास्तूशास्त्रात झोपण्याशी संबंधित काही नियम सांगितले गेले आहेत. हे नियम पालन केल्यास व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्थिती ठीक राहते. चला बघुया झोपण्याची दिशा, जागा इत्यादींवर लक्ष कसे व का ठेवणे महत्त्वाचे आहे.

वास्तूनुसार पूर्व दिशेकडे डोकं ठेऊन झोपने शुभ राहते. यामुळे सकारात्मकता आणि अभ्यासात एकाग्रता वाढते. पश्चिम दिशेकडे डोकं ठेऊन झोपल्याने देखील सर्व काही ठीक होते. यामुळे प्रगतीमध्ये वाढ होते.

तसे तर वास्तूमध्ये उत्तर दिशेला अत्यंत शुभ मानले जाते मात्र या दिशेकडे डोकं ठेऊन झोपल्याने अनेक प्रकारचे रोग होतात. दक्षिण दिशेकडे डोकं ठेऊन झोपल्याने वाईट विचार येत नाहीत. या दिशेकडे डोकं ठेऊन झोपल्याने ताण येत नाही. याव्यतिरिक्त दक्षिण दिशेकडे डोकं ठेऊन झोपल्याने सुख-समृद्धी वाढते.

शास्त्रात सांगितले गेले आहे की, कधीही मोडलेल्या पलंगावर झोपले नाही पाहिजे तसेच कधीही खरकट्या तोंडाने झोपले नाही पाहिजे. नेहमी झोपताना हात व पाय धुतले पाहिजे. कधीही कपडे काढून झोपले नाही पाहिजे आणि कधीही अंधार असलेल्या खोलीत झोपले नाही पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.