ज्योतिष विद्वानांनुसार यावेळेस चंद्र ग्रहणात सुतक काळ लागणार नाही. ग्रहणादरम्यान गरोदर महिलांना विशेष काळजी घेण्याची गरज असते. गरोदर महिलांनी या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवावे –
ग्रहणादरम्यान गरोदर महिलांनी धारदार गोष्टींचा वापर नाही केला पाहिजे जसे की चाकू, कातर, सुई इत्यादी. शास्त्रात असे देखील सांगितले जाते की फक्त महिलांनीच नाही तर त्यांच्या पतीने देखील अशा गोष्टींचा वापर नाही केला पाहिजे. असे मानले जाते की असे केल्याने त्यांच्या बाळाच्या अंगाला ईजा होते.
ग्रहणादरम्यान गरोदर महिलांनी बाहेर नाही गेले पाहिजे. असे मानले जाते की जर गरोदर महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट प्रभाव त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर पडतो. जन्मानंतर बाळाच्या अंगावर काही ना काही डाग नक्कीच पडतो.
गरोदर महिलांनी ग्रहणादरम्यान बनवलेले अन्न खाल्ले नाही पाहिजे. असे म्हणले जाते की यावेळेस पडणारे हानिकारक किरणे अन्न दूषित करून टाकतात. अशात जर घरी जेवण बनले असेल तर त्यात लगेच तुळशीचे पान टाकावे. ग्रहण संपल्यानंतर त्याला काढून टाकावे. असे केल्याने ग्रहणानंतर देखील अन्न शुद्ध राहते.
अशी मान्यता आहे की ग्रहण संपल्यानंतर गरोदर महिलांनी अंघोळ केली पाहिजे. नाहीतर बाळाला त्वचेशी संबंधित रोग होऊ शकतो. ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी गरोदर महिलेला तुळशीचे पान जिभेवर ठेऊन हनुमान चालीसा किंवा दुर्गा स्तुतीचे वाचन केले पाहिजे.