49 वर्षांच्या आर. माधवन वर झाले 18 वर्षीय चाहती चे प्रेम !! चक्क सर्वांसमोर घातली लग्नासाठी मागणी..

लोकप्रिय चित्रपट अभिनेते आर. माधवन खूप लवकरच दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट ‘ रॉकेट्री द नंबी इफेक्ट ‘ प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ते मुंबई मधून आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून परत आले आहेत. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाची गोष्ट शेयर करताना अभिनेत्याला एका जबरदस्त चकित करणाऱ्या क्षणाचा सामना करावा लागला. जेव्हा 49 वर्षांच्या आर. माधवन ला त्यांच्या एका किशोरवयीन चाहतीने लग्नाची मागणी घातली.

आता या मागणीची चर्चा बॉलिवूड पासून ते पार दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील होत आहे. कारण की चित्रपट कलाकारांना अशा मागण्या तर अनेकवेळा येतात, मात्र माधवन यांना या वयात एका लहान वयाच्या चाहती कडून लग्नासाठी मिळालेली मागणी सर्वांना थक्क करून गेली. कारण त्यांना लग्नाची मागणी घालणारी मुलगी केवळ 18 वर्षांची आहे.

या चाहतीने इंस्टाग्राम वर आर. माधवन यांच्या पोस्ट वर लिहिले आहे की, ‘ हे काय चुकीचे आहे का की मी 18 वर्षांची आहे आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे. ‘ या टिप्पणीच्या काही वेळानंतर अभिनेत्याने खूपच प्रेमाने आणि आपलेपणा सोबत या चाहतीला उत्तर दिले की, ‘ हा हा, देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर असो…तुला दुसरा कोणी चांगला व्यक्ती मिळेल. ‘

माधवन ने दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट ‘ रॉकेट्री द नंबी इफेक्ट ‘ ला निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जगातील अर्ध्याहून जास्त देशांत झाली आहे. चित्रपट यामुळे चर्चेत आहे की यामध्ये हिंदी व तमिळ चित्रपटांपासून ते हॉलिवूड पर्यंतचे अनेक लोकप्रिय अभिनेते सामील आहेत. हा चित्रपट अंतरीक्ष वैज्ञानिक नंबी नारायण यांचा बायोपिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.