हा व्हिडिओ बघून एकता कपूर ची उडाली झोप !! म्हणाली, ‘एकटं झोपायला वाटते भीती…’

निर्माती एकता कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. एकता कपूर आपल्या रहस्यमयी आणि जादुई कार्यक्रमांसाठी ओळखली जाते. एकता ने आता एक असा व्हिडिओ बघितला आहे, ज्या व्हिडिओ ने त्यांची झोप उडवली आहे. हे कोणत्याच दूरदर्शन मालिकेतील दृश्य नाही आहे, तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ आहे.

एकता कपूर चीच नाही तर हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांची देखील झोप उडवत आहे. एकता ने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेयर केला आहे. एकता कपूर ने व्हिडिओ शेयर करून खाली लिहिले आहे की, ‘ हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप भयानक आहे जे एकटे झोपतात.

हा व्हिडिओ हजारीबाग झारखंड चा आहे. आता हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. व्हिडिओ मध्ये एक विचित्र वस्तू रस्त्यावरून चालताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप शेयर केले जात आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओला लोकांना घाम फुटत आहे.

या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर हा व्हिडिओ हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसांडी चतरा रस्त्यावरील आहे, जिथे ही विचित्र वस्तू कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोक हा व्हिडिओ बघून हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर लोक विचारत आहेत की हे काय आहे ? कोणी याला भूत म्हणत आहे तर कोणी परग्रह वासी. मात्र अद्यापही हे काय आहे याबद्दल काहीच माहिती समोर आली नाही आहे.

तसे, निर्माती एकता कपूर यांच्या मालिकेत अश्या प्रकारच्या गोष्टी दिसतात. ‘ नागीण ‘ आणि ‘ चुडैल ‘ या दोन्ही त्यांच्या लोकप्रिय मालिका आहेत. तसेच एकता ची मालिका ‘ नागीण ‘ चे 6 वे पर्व येत आहे. या पर्वासाठी नियी फतनानी ला साइन केले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.