” माझ्या सोबत एक रात्र झोप मग…”, या प्रसिद्ध अभिनेत्री चा धक्कादायक खुलासा !!

लोकप्रिय अभिनेत्री किश्वर मर्चंट नेहमीच आपल्या रोखठोक विधानांमुळे आणि विचारांमुळे ओळखली जाते. प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर त्या सोशल मीडियावर आपली बाजू मांडल्याशिवाय राहत नाही. यावेळेस देखील असेच झाले आहे की जेव्हा किश्वर मर्चंट यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल खुलासा केला आहे.

त्यांनी सांगितले की त्या कास्टिंग काऊच चा शिकार होण्यापासून कशा वाचल्या. त्यांना एका मोठ्या नायकासोबत झोपण्यास सांगितले होते. किश्वर मर्चंट या लवकरच आई होणार आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी दूरदर्शन अभिनेते सुरेश राय यांच्यासोबत लग्न केले. किश्वर मर्चंट या त्या अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्या आपले मत मांडण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत.

एका विशेष मुलाखती दरम्यान किश्वर यांनी सांगितले की कशी त्यांच्या कारकिर्दीत ती वेळ आली होती, जी चित्रपट सृष्टीसाठी अगदी सामान्य गोष्ट होती. अनेकवेळा कलाकारांना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला भूमिका मिळवण्यासाठी कास्टिंग काऊच सारख्या भयानक वातावरणाचा सामना करावा लागतो. किश्वर या हे देखील म्हणाल्या की वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्याचा त्यांना खूप आनंद आहे. त्या लवकरात लवकर कामावर पुन्हा येतील.

किश्वर मर्चंट यांनी एका मुलाखतीत कास्टिंग काऊच चा किस्सा शेयर करताना सांगितले की माझ्यासोबत हे तेव्हा झाले जेव्हा मी एका मुलाखतीसाठी गेली होते. त्या पुढे म्हणतात की या मुलाखतीत माझ्यासोबत माझी आई देखील होती. मला म्हणले गेले होते की एका मोठ्या अभिनेत्यासोबत संबंध बनवावे लागतील. मी लगेच यासाठी नकार दिला. मी तिथून चालल्या गेली.

किश्वर या हे देखील म्हणाल्या आहेत की मी असे नाही म्हणत की हे नेहमी होते. ही सामान्य गोष्ट आहे. चित्रपटसृष्टी बदनाम आहे मात्र प्रत्येक चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी होतात. जेव्हा किश्वर यांना विचारले गेले की काय त्या नायक व निर्मात्यांची नावे मोठी आहेत. तर त्या म्हणाल्या की हो, दोघांचेही मोठे नाव होते.

Leave a Reply

Your email address will not be published.