‘ या ‘ अभिनेत्रीकडे मूल जन्माला घालण्यासाठी देखील नव्हते पैसे ! मुलीने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हल्लीच आपले आत्मचरित्र ‘ सच कहू तो ‘ ला प्रदर्शित केले होते. या आत्मचरित्रात काही अशा गोष्टींचा खुलासा झाला, जो बघून लोक दंग झाले. हल्लीच नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा ने पुस्तकाचा एक अंश सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.

नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्राबद्दल चाहत्यांच्या आतमध्ये खूप उत्सुकता आहे. विशेष करून त्यांची मुलगी मसाबा खूप जास्त उत्सुक आहे. हल्लीच मसाबा ने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर पुस्तकाचे काही भाग शेअर केले आहेत, ज्यामध्ये नीनाच्या गरोदरपणाचा व आर्थिक तंगीचा खुलासा केला गेला आहे.

नीनाच्या पुस्तकाच्या भागात लिहिले आहे की, ‘ मी त्यावेळी खूप चिंतेत राहत होते जेव्हा माझ्या बाळंतपणाची तारीख जवळ येत होती, कारण माझ्या खात्यात खूप कमी पैसे होते. मी फक्त सामान्य बाळंतपणच करू शकत होते कारण याचा खर्च फक्त 2,000 रुपये होता.

मला माहित होते की मी जर शस्त्रक्रिया केली तर मी अडचणीत पडून जाईल, कारण याचा खर्च जवळपास 10,000 रुपये होता. सुदैवाने, बाळंतपणाच्या दोन दिवसाअगोदरच माझ्या खात्यात कर परतफेडाचे 9, 000 रुपये आले होते आणि माझ्या खात्यात 12,000 रुपये झाले होते.

बरं झालं की हे पैसे आले, कारण मला डॉक्टरांनी सांगितले होते की आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागेल.’ या पैशानंतरच नीना मुलगी मसाबा ला जन्म देऊ शकली. मसाबा ने या फोटोंसोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘ जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईच्या बँक खात्यात फक्त 2,000 रुपये होते.

वेळेवर आलेल्या कर परतफेडाने त्या किंमतीचे 12,000 केले आणि मी तर एक निश्चितपणे एक शस्त्रक्रियेणे झालेली मुलगी होते. जेव्हा मी आईचे जीवन चरित्र वाचले, तर मला बऱ्याच गोष्टींबद्दल माहित पडले आणि अनेक संकटांमधून देखील तीला जावे लागले.

मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी खूप कष्ट करते आणि कधीही आपल्या हक्काच्या गोष्टी इतरांना घेऊ देत नाही. फक्त हेच निश्चित करण्यासाठी की त्यांनी मला या जगात आणण्यासाठी त्यांनी जे काही केले, मी त्याचे कर्ज उतरवू शकेल, ते पण व्याजासकट.

Leave a Reply

Your email address will not be published.