दक्षिणेतील ‘ या ‘ अभिनेत्रीला बॉलिवूड पासून वाटते भीती ! सांगितले धक्कादायक कारण…

हल्लीच एका मुलाखती दरम्यान समंथा ने सांगितले आहे की त्यांचे बॉलिवूड मध्ये काम न करण्यामागे काय कारण आहे. समंथा म्हणाली की त्यांना बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यास भीती वाटते. मनोज बाजपेयी यांची वेबसीरीज ‘ द फॅमिली मैन 2 ‘ च्या माध्यमातून आपले डिजिटल पदार्पण करत असणारी समंथाशी जेव्हा हिंदी चित्रपटात काम न करण्याचे कारण विचारल्या गेले तर बॉलिवूड हंगामा सोबत गप्पागोष्टी करताना समंथा म्हणाली, ‘ कारण मला भीती वाटते. ‘

गप्पागोष्टी करताना समंथा म्हणाली की बॉलिवूड मधील लोकांमध्ये खूप अजब प्रतिभा आहे. म्हणून त्यांना बॉलिवूड मध्ये काम करायला भीती वाटते. समंथाला जेव्हा विचारल्या गेले होते की त्यांना कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल तर त्यांनी रणवीर कपूर यांचे नाव घेतले.

समंथाने सन 2010 मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. ‘ ये माया चेसावे ‘ त्यांचा पहिला चित्रपट होता जो एवढा यशस्वी ठरला की त्याचा हिंदी रिमेक देखील बनवल्या गेला. हिंदी रिमेक चे नाव बनवणाऱ्यांनी ‘ एक दिवाना था ‘ असे ठेवले.

‘ डोकुडू ‘, ‘ इगा ‘, ‘ अत्तारीनतीकी दरेडी ‘, ‘ कथथी ‘, ‘ थेरी ‘ आणि ‘ रंगस्थलाम ‘ यासर्व चित्रपटांची समंथाच्या यशस्वी चित्रपटांमध्ये गणना केली जाते. ‘ द फॅमिली मैन 2 ‘ च्या ट्रेलरमध्ये समंथाचे काम खूपच कमालीचे वाटले आहे आणि आता चाहते ही सीरीज सुरू होण्याची वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.