आई-वडिलांच्या घटास्पोटाने आनंदी होती श्रुती हसन ? अभिनेत्रीने केले चकित करणारे विधान

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीया अशा आहेत ज्या न लग्न करताच आई झाल्या. यामधूनच एक आहे सारिका. सारिका लग्न करण्याअगोदरच श्रुती हसन ची आई झाली होती. आई झाल्यानंतर सारिका आणि कमल हसन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तथापि 16 वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे श्रृती हसन खूप आनंदी होती. दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री श्रुती हसन तमिळ चित्रपट अभिनेते कमल हसन आणि सारिका यांची मुलगी आहे. तमिळ अभिनेते कमल हसन आणि सारिका लग्नाच्या 16 वर्षानंतर वेगळे झाले होते.

त्यावेळी चित्रपट अभिनेत्री श्रुती हसन आणि त्यांची बहीण अक्षरा हसन या दोघी लहानच होत्या. हल्लीच अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला की ती आपल्या आई-वडिलांच्या घटस्पोटावेळी दुःखी नव्हती तर आनंदी होती. श्रुती हसन ने झूम ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ मी फक्त त्या दोघांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी उत्साहित होती.

मला आनंद आहे की ते दोघे वेगळे झाले. कारण मला असे वाटत होते की जेव्हा दोन्ही व्यक्ती एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, तर कोणतेच कारण त्यांना सोबत ठेऊ शकत नाही. ते खूप चांगले आई-वडील आहे. मी विशेष करुन माझ्या वडिलांशी जवळ आहे. माझी आई माझ्या आयुष्याचा भाग आहे. हे आमच्या सर्वांसाठीच चांगले होते. ‘

अभिनेत्री ने म्हणले की, ‘ ते दोघेही खूप चांगले व्यक्ती आहेत. मात्र एकत्र ते असे नव्हते. त्यांचे सोबत राहणे हे त्यांचे चांगलेपण संपवत होते. ते जेव्हा वेगळे झाले. तेव्हा मी खूप लहान होते. हे सर्व खूप सोपे होते आणि आम्ही सगळे खूप आनंदी होतो.

‘श्रुती हसन चे हल्लीच प्रदर्शित झालेले चित्रपट ‘ क्रैक ‘ आणि ‘ वकील साब ‘ यांना कोरोना काळादरम्यान देखील प्रेक्षकांची खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. आता अभिनेत्री आपला आगामी चित्रपट ‘ सालार ‘ बद्दल चर्चेत आहे. ज्यामधे ती अभिनेता प्रभाव सोबत पडद्यावर काम करेल.

Leave a Reply

Your email address will not be published.