आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या फराह खान यांच्या प्रेमात वेडे झाले होते शिरीष कुंदेर ?? अशाप्रकारे घातली होती मागणी..

बॉलिवूड मध्ये कधीही शक्तिशाली महिलांचे नाव घेतले जाते तर फराह खान यांचे नाव नक्की येते. फराह खानचे नाव जिथे घेतले जाते तिथे त्यांचे पती शिरीष कुंदेर यांचे देखील नाव घेतले जाते. शिरीष कुंदेर आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया शिरीष व फराह खान यांच्या प्रेम कहाणीबद्दल..

शिरीष कुंदेर यांचा जन्म 24 मे 1973 रोजी मंगलोर मध्ये झाला होता. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मोटोरोला कंपनीमध्ये काम करणे सुरू केले. जवळपास चार वर्षापर्यंत मोटोरोला कंपनीत काम केल्यानंतर शिरीष यांनी चित्रपटात काम करणे सुरू केले.

शिरीष यांनी चित्रपटसृष्टीत एडिटर म्हणून काम केले. शिरीष आणि फराह यांची प्रेम कहाणी ‘ मैं हू ना ‘ या चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाली होती. शिरीष यांना फराह खूप पसंत होत्या. अशामध्ये जेव्हा शिरीष यांना चित्रपटासाठी एडिटर काम करणार का म्हणून विचारल्या गेले तर त्यांनी काहीही विचार न करता लगेच होकार देऊन टाकला होता.

शिरीष यांना या कामासाठी पैसे देखील कमी भेटले नव्हते. आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या फराह साठी शिरीष यांनी या कामाला होकार दिला. फराह या शिरीष यांच्या भावनांबद्दल अवगत नव्हत्या. त्या आपल्या चित्रपटात जास्त व्यस्त रहात असत कारण त्यांच्याकडे प्रेमासाठी वेळ नव्हता.

लवकरच त्यांना वाटले की शिरीष हा एक चतुर व्यक्ती आहे तर त्या त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. यानंतर त्यांनी 7 महिन्यांपर्यंत एकमेकांना डेट केले होते. शिरीष यांनी फराह समोर आधीच मागणी घातली होती. मात्र त्यांना टाईमपास करायचा नव्हता, ते फराह सोबत आपले भविष्य बघत होते.

फराह यांनी एका टॉक शो दरम्यान सांगितले होते की, ‘ शिरीष मला म्हणाला की प्रिये जर तुला माझ्यासोबत लग्न करायचे नसेल, तर तू चालली जा. मला फक्त तुला बघून वेळ वाया घालवायचा नाही आहे. जर तू आपल्या बाबतीत गंभीर असशील आणि आपण लग्न करणार असलो तर आपण आपले नाते पुढे घेऊन जाऊया. ‘

फराह यांनी खूप विचार केला आणि मग नंतर यांच्या मागणीला होकार दिला. 2004 मध्ये दोघांनी आधी नोंदणीकृत लग्न केले आणि मग नंतर दक्षिण भारतीय शैलीत लग्न आणि निकाह केला. आज दोघेही जार, दीवा आणि आन्या यांचे आई-वडील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.