प्रियंका चोप्रा कॉफी विथ करण मध्ये दिसली होती. आता तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती सांगत आहे की कशाप्रकारे एका महिलेने त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून प्रियंका त्यांच्यासोबत रोमँटिक राहील. यावर प्रियंका चोप्राने हे खोटे बोलले होते की त्यांचा प्रियकर आहे आणि त्या अस नाही करू शकत. प्रियंका चोप्रा कॉफी विथ करण मध्ये 2014 मध्ये दिसली होती. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. प्रियंका चोप्राला करण जोहरने विचारले आहे की कोणत्यातरी तरी एखाद्या बिकट परिस्थिती मध्ये त्यांनी असे म्हणले आहे की त्या कोणाला तरी डेट करत आहेत. या भागात प्रियंका चोप्रा शिवाय दीपिका पादुकोण देखील होती.
यावर प्रियंका चोप्रा म्हणते की, ‘ मला एका लेस्बिअन मुलीकडून प्रस्ताव मिळाला होता. ‘ प्रियंका चोप्रा यावर सांगताना पुढे म्हणतात की, ‘ माझ्यासोबत अशी घटना घडून जाते. ही काही काळापूर्वीची नाइट क्लबची गोष्ट आहे. त्या मुलीला हे माहीत नव्हते की मी अशा डेटस नाही करत. ती खूप चांगली होती. माझे मन जिंकण्याचे ती खूप प्रयत्न करत होती. मला हे समजत नव्हते की मी तिला कसे सांगू कारण मी तिला ओळखत होते. मला फक्त तिला हे सांगावे लागले की बेब, माझा प्रियकर आहे. खरतर तो कोणी नव्हता मात्र मला मुलांना डेट करायला आवडते.
प्रियंका चोप्राने आपले पुस्तक ‘ अनफिनिश्ड ‘ मध्ये देखील रोमँटिक नातेसंबंधांबद्दल उल्लेख केला आहे. त्यांचे पती निक जोनास ने देखील मानले आहे की प्रियंकाला रोमँटिक गोष्टी वाचायला मजा येते. प्रियंका चोप्राने निक जोनास सोबत लग्न केले आहे. प्रियंका चोप्रा एक उत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.