वयाच्या 50 व्या वर्षी देखील 20 वर्षांच्या दिसतात ‘ या ‘ अभिनेत्री ! त्यांचे फोटोज आहेत याचा पुरावा..

चित्रपटजगताचा नियम आहे की नवीन चेहरे येताच जुन्या चेहऱ्यांची चमक फीकी पडून जाते. असे जवळपास प्रत्येक चित्रपट उद्योगात बघायला मिळते. हॉलिवूड पासून ते टाॅलीवूड पर्यंत हीच परंपरा चालत आहे. यामध्ये हिंदी चित्रपसृष्टीती म्हणजे बॉलिवूड देखील लपलेले नाही आहे. चित्रपट जगतात 100 वर्ष पूर्ण केलेल्या बॉलिवूड ने आता अनेक दशक बघितले आहेत.

प्रत्येक दशकात एक खास ट्रेंड बघायला मिळाला. चित्रपटाच्या एका विशेष पटकथेपासून ते, कलाकार, सेट, कृती, संगीत, पोशाख आणि प्रेक्षकांपर्यंत हे हळू-हळू परिवर्तित होत गेले. बदलत्या पर्वासोबत चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटसृष्टीची स्थिती देखील बदलली. मात्र एक गोष्ट जी बदलली नाही ती आहे रीत, ज्यामधे जुन्या कलाकारांना निवृत्त होण्याचे पदक मिळून जाते.

तर आज आम्ही बॉलिवूड मधील अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा 50 वर्षांपेक्षा जास्त वयामध्ये देखील मनोरंजन उद्योगात सर्व सोशल मीडियावर जलवा कायम आहे आणि त्यांनी हे सिद्ध केले आहे की वय हे फक्त एक संख्या आहे.

रेखा
हिंदी चित्रपटसृष्टीत जेव्हापण ‘ जुनं ते सोनं ‘ याबद्दल चर्चा होते तर दक्षिणेकडील सुंदरी भानुरेखा गणेशन म्हणजेच रेखा यांचा हमखास उल्लेख केला जातो. चित्रपसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा 66 वर्षांच्या आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘ अंजाना सफर ‘ हा होता, ज्याचे चित्रीकरण 1969 मध्ये झाली होती.

मात्र काही कारणामुळे हा चित्रपट 10 वर्षानंतर ‘ दो शिकारी ‘ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे असलेले कलाकार विश्वजित यांच्यासोबत 15 वर्षांच्या रेखाच्या एका चुं’बनाच्या दृश्याने त्यांना रातोरात चर्चित केले होते. ज्याच्या उल्लेख रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘ रेखा द अनटोल्ड स्टोरी ‘ मध्ये केला आहे.

संगीता बिजलानी
9 जुलै 1960 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या संगीता बिजलानी 60 वर्षांच्या आहेत. एवढे वय असूनही संगीता यांनी स्वतःला फिट ठेवले आहे. संगीता बिजलानी या आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चित राहिल्या आहेत. संगीता यांनी आपल्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षीच केली होती.

त्यांनी निरमा व पोंड्स बरोबरच अनेक जाहिरातीत देखील काम केले आहे. सन 1980 मध्ये संगीता यांना मिस इंडिया म्हणून निवडले गेले होते. संगीता ने बॉलिवूड मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1988 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ कातील ‘ पासून केली होती.

भाग्यश्री
सलमान खान सोबत चित्रपट ‘ मैंने प्यार किया ‘ पासून बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे. भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शाही परिवारात झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कच्ची धूप पासून केली होती. आज देखील या अभिनेत्रीच्या सुंदरतेते काहीच कमी नाही आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.