वयाच्या 50 व्या वर्षी ही सुपर मॉडेल झाली आई ?? मुलीचे फोटोज केले शेअर

ब्रिटिश सुपर मॉडेल नाओमी कॅम्पबेल च्या घरात आनंदाने दस्तक दिली आहे. 50 वर्षीय नाओमी यांनी या महामारीच्या काळात एका लहानशा बाहुलीचे आपल्या आयुष्यात स्वागत केले आहेत. ब्रिटिश सुपर मॉडेल ने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

या फोटोमध्ये नाओमी आपल्या मुलीचे पाय पकडताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नाओमी ने लिहिले आहे की, ‘ एका सुंदर आशीर्वादाने मला आपली आई बनवली आहे. या गोड मुलीचे माझ्या आयुष्यात येणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझी सुंदर राजकुमारी मी तुझ्यासोबत आयुष्यभर जो प्रवास करणार आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही. यापेक्षा मोठे कोणतेच प्रेम नाही आहे. ‘

मात्र हे अजून स्पष्ट झाले नाही आहे की या मुलीचे वडील कोण आहेत ? सोबतच याबद्दल देखील काही माहिती मिळाली नाही आहे की या मुलीला त्यांनी स्वतः जन्म दिला आहे, सेरोगेसी ने प्राप्त केला आहे की त्यांनी मुलीला दत्तक घेतले आहे ? नाओमीच्या आई होण्यावर चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

डिझाइनर मार्क जेकब यांनी लिहिले आहे की, ‘ अरे माझ्या देवा ! आजचाच तो दिवस आहे ? हा किती शानदार आहे. ती किती नशीबवान आहे आणि तू पण. तू नक्कीच एक चांगली आई होशील. देवाची कृपा तुझ्यावर नेहमी राहो. ‘

ब्रिटिश वोग चे संपादक एडवर्ड एनिनफुल यांनी टिप्पणी करताना लिहिले की, ‘ तुम्हा दोघांना बघून माझा दिवस चांगला झाला. तुम्ही दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आनंद भराल. काही वर्षांपूर्वीच नाओमीने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली आई होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘ विज्ञानाच्या मदतीने ती आता कधीही आई होण्याचा विचार करत आहे. ‘

Leave a Reply

Your email address will not be published.