बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या अभिनयामुळे खूप चर्चेत राहतात सोबतच त्या आपल्या बेधडक अंदाजासाठी देखील ओळखल्या जातात. नीना ह्या प्रत्येक मुद्द्यावर आपली बाजू बिनधास्तपणे मांडतात. ज्यामध्ये त्या विशेषत: लग्न, कारकिर्द, मुले आणि महिलांच्या अधिकारांसारख्या अनेक मुद्द्यात सामील असतात. आजच्या काळात ज्या गोष्टी आता देखील समाजासाठी अत्यंत आधुनिक मानल्या जातात त्या नीनासाठी खूप सामान्य गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यात नीना तेच करायला आवडते जे त्यांना योग्य वाटते. तेच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या एकटेपणाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
नीना गुप्ता यांनी आरजे ( रेडिओ जॉकी ) सिद्धार्थ कन्नन ला दिलेल्या आपल्या एका मुलाखतीत एकटेपणाबद्दल संघर्ष करताना सांगितले की त्यांना आयुष्यात नेहमी एकटेपणा वाटला आहे. त्यांचा कोणी प्रेमी व पती नसल्यामुळे अनेक वर्षांपर्यंत या गोष्टीचा त्यांना सामना करावा लागला आहे. सोबतच नीना यांनी सांगितले की त्या तो एकटेपणा दूर करण्यासाठी सक्षम होत्या कारण त्या भूतकाळावर लक्ष देत नव्हत्या.
या मुलाखतीत नीना यांनी आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त खाजगी आयुष्याबद्दल मुक्तपणे चर्चा केली आहे. नीना यांनी आपल्या आयुष्यातील एकटेपणाबद्दल बोलताना सांगितले की , ‘ हे माझ्या आयुष्यात अनेकवेळा झाले. कारण अनेक वर्षापर्यंत माझा ना कोणी प्रियकर होता ना कोणी पती होता. खर सांगायचे झाले तर माझे वडिलंच माझे प्रियकर होते. हे तेव्हा झाले जेव्हा कामावर माझा अपमान केला जात होता. मी अनेकवेळा एकटेपणा अनुभवला आहे, मात्र देवाने मला ती शक्ती दिली आहे ज्यामुळे मी नेहमी पुढे जाण्यासाठी सक्षम आहे. मी भूतकाळावर जास्त लक्ष देत नाही. नीना वेस्टइंडिज चे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत नातेसंबंधात होत्या, ज्यापासून त्यांची मुलगी मुबासा गुप्ता आहे. मात्र व्हिव्हियन आणि नीना यांचे नाते फारकाळ टिकू शकले आणि ब्रेकअप झाला होता. यानंतर नीना यांनी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केले.