भूषण कुमार ला ‘ या ‘ कारणामुळे नाकारले होते दिव्या खोसला ने ! जाणून घ्या पुन्हा कशी झाली प्रेमाची सुरुवात..

अनेक जाहिराती आणि काही गाण्यांच्या व्हिडिओ मध्ये दिसलेली दिव्या टी-सीरीज म्युझिक आणि चित्रपट निर्मिती कंपनी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. भूषण कुमार सोबत दिव्याने सन 2005 मध्ये लग्न केले होते. जेव्हा त्यांचे लग्न झाले होते तेव्हा दिव्या मात्र 21 वर्षांची होती. त्यांची प्रेमकथा देखील खूप मनोरंजक आहे. खरंतर, दिव्या खोसला ने खूपच कमी वयात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दिव्या खोसला कुमार ने सन 2005 मध्ये वैष्णव देवीच्या मंदिरात भूषण कुमार यांच्यासोबत सात फेरे घेतले होते. 2011 मध्ये त्यांचा मुलगा रुहान याचा जन्म झाला, जो आता 7 वर्षांचा झाला आहे. दिव्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 मध्ये आलेला चित्रपट ‘ अब तुम्हारे हवाले वतन साथियों ‘ पासून केली होती. या चित्रपटात दिव्या अक्षयकुमारच्या पत्नीच्या भूमिकेत होती तथापि हा चित्रपट जास्त चालला नाही.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांची पहिली भेट झाली. ही भेट खूपच व्यावसायिक होती. मात्र या दरम्यान भूषण कुमार यांना दिव्याशी प्रेम झाले. ज्यानंतर भूषण कुमार आणि दिव्या यांनी एकमेकांना मेसेज पाठवायला सुरुवात केली. दिव्याने एका वेळेनंतर भूषण कुमार यांच्या मेसेजला उत्तर देणे बंद करून टाकले. मात्र दिव्याने इश्कबाजी करण्याच्या प्रतिमेने भूषण कुमार यांना नाकारले होते. तथापि, नंतर त्यांनी अभिनेत्री सोबत तिच्या घरच्यांना देखील राजी केले होते.

एका मुलाखती दरम्यान दिव्याने सांगितले होते की ती एका पुराणमतवादी पंजाबी कुटुंबातून होती आणि ती अशीच कोणत्यापण श्रीमंत मुलाच्या जवळ जाणार नव्हती. दिव्याला असे वाटत होते की भूषण कुमार फक्त तिच्यासोबत मजे घेत आहेत. म्हणून थोड्याफार चॅटिंग नंतर दिव्याने उत्तर देणे बंद केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.