एक काळ होता जेव्हा मुंबईत अंडवर्ल्डचे राज्य चालू होते. डॉनच्या जाळ्यात सामान्य नागरिकच नाही तर बॉलिवूड देखील खूप वाईटपणे फसले होते. अनेक मोठ्या अभिनेत्या व अभिनेत्रींचे अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत उठणे बसणे होत होते. अंडरवर्ल्ड मधील अनेक डॉन यांचे अभिनेत्रींवर देखील प्रेम झाले होते आणि काहींनी तर लग्न देखील केले होते.
मात्र आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही होती की ज्या अभिनेत्रीचे नाव कोणत्याही डॉन सोबत जोडले गेले त्या अभिनेत्रीची कारकीर्द फार काळ टिकली नाही. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री सोना व अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान बद्दल सांगणार आहोत. अभिनेत्री सोना ला मधुबाला यांचे प्रतिबिंब मानले जाते.
हाजी मस्तान मधुबाला यांच्या सुंदरतेवर फिदा होता. तो त्यांचा एवढा चाहता होता की त्याला बस त्यांना आपल बनवायचं होत. हाजी मस्तान आपल्या प्रेमाबद्दल मधुबाला यांना सांगणार होते मात्र मधुबाला यांचा मृत्यू झाला. मधुबाला यांच्या मृत्यूने जिथे हाजी मस्तान यांना धक्का बसला तिथेच त्यांच्या मृत्यूने त्यांच्या सारखी दिसत असणाऱ्या अभिनेत्रीचे भाग्य उजळले.
ती होती अभिनेत्री सोना जी हुबेहूब मधुबाला सारखी दिसत होती. सोना चा जेव्हा चित्रपटामध्ये प्रवेश झाला तर एकवेळ लोकांना वाटले की मधुबाला च परत आली आहे. फक्त एवढेच नाही तर दिलीप कुमार देखील हैराण झाले होते की कोणाचा चेहरा हा एवढा कसा मिळू शकतो.
सोना आणि मधुबाला यांच्या एकसारखे पणाच्या बातम्या जोर धरत होत्या. यादरम्यान हाजी मस्तान यांना देखील याबद्दल समजले. सोनाला बघतच हाजी मस्तान यांच्या डोळ्यासमोर मधुबाला चा चेहरा फिरू लागला.
हाजी मस्तान यांनी सोनाला पहिल्यांदा आपल्या निर्मित चित्रपटात पाहिले होते तेव्हाच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर हाजी मस्तान थेट लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्या घरी पोहचले आणि सोना ने हाजी यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव स्वीकार केला.