जेव्हा शाहरुख ने काजोल ला घेतले मिठीत आणि मग अचानक आपटले खाली !! जाणून घ्या काय होती काजोलची प्रतिक्रिया ?

बॉलिवुड मधील काही कलाकार असे आहेत ज्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. चाहते त्यांना पडद्यावर बघून खूप खुश होतात. अशामध्ये शाहरुख खान आणि काजोल यांचे नाव घेणे महत्त्वाचे ठरून जाते कारण त्यांचा पडद्यावरील रोमांन्स आणि पडद्याबाहेरील मैत्रीचे सर्वजण चाहते आहेत. शाहरुख आणि काजोल यांनी बॉलिवूड मधील अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले आहे. पडद्यावर जर शाहरुख आणि काजोल असतील तर चित्रपटाचे हिट होणे हे निश्चित आहे. दोन्ही कलाकारांची सर्वात खास गोष्ट ही आहे की या ते पडद्यावर खूप घट्ट प्रेम दाखवतात मात्र कॅमेरा बंद होताच मस्तीच्या मूडमध्ये येऊन जातात. असाच एक किस्सा चित्रपट ‘ दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे ‘ च्या चित्रीकरणा दरम्यान झाला होता. चला तर मग घेऊया नेमके काय झाले होते…

चित्रपट ‘ दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे ‘ हिंदी चित्रपटांतील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात कलाकारांच्या अभिनयापासून ते गाणे, संवाद, रोमांन्स सर्वच काही प्रेक्षकांना आवडले होते. याच चित्रपटाच्या ‘ रुक जा ओ दिल दिवाने ‘ या गाण्याचे दिग्दर्शन फराह खान यांनी केले होते. या गाण्यात दाखवले गेले होते की शाहरुख हे काजोल सोबत फ्लर्टिंग करताना दिसतात आणि गाणे संपताच ते काजोल ला खाली पाडून देतात.

काजोल ने एका मुलाखतीत सांगितले होते की गाणे कसे चित्रित होणार आहे, त्यांना कसे हावभाव करायचे आहेत मात्र खाली पडण्याची गोष्ट त्यांना कोणीच सांगितली नव्हती. काजोल म्हणाली की, ‘ फराह खान यांनी शाहरुख ला एकांतात सांगितले होते की तू काजोल सोबत नाचताना तिला मिठीत घे आणि मग तिला घालू पाडून टाक, मात्र तिला सांगू नको. अशामध्ये जेव्हा ते दृश्य चित्रित झाले तर शाहरुख ने अचानक असेच केले आणि मी एकदम अवाक झाले. अशामध्ये या दृश्याला खूप पसंत केले गेले होते कारण माझे हावभाव हे नैसर्गिक होते.

Leave a Reply

Your email address will not be published.