शिल्पा शेट्टी ह्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात मात्र यामध्ये त्यांचे पती देखील त्यांच्यापेक्षा कमी नाही आहे. राज कुंद्रा सतत व्हिडिओ शेअर करत राहतात. हल्लीच शिल्पाच्या पतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामधे राज कुंद्रा आपली पत्नी शिल्पाला माहेरी पाठवण्यासाठी शक्कल लढवत आहेत.
राज कुंद्रा यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हिडिओ बघून लोक आश्चर्यचकित पण होत आहेत आणि हसत देखील आहेत. व्हिडिओ मध्ये राज पत्नी शिल्पाला विचारतात की, ‘ ऐक जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील ? यावर शिल्पा उत्तर देताना म्हणतात की अर्धी रक्कम घेईल आणि कायमची आपल्या माहेरी निघून जाईल. बस शिल्पाचे हे बोलणे ऐकून खुश होऊन राज म्हणतात की एक हजाराची लॉटरी लागली आहे आज. ही घे अर्धी रक्कम आणि निघ इथून. ‘
व्हायरल झाला व्हिडिओ
राज मजेदार अंदाजात शिल्पा यांना धक्के मारून शिल्पाला घरातून बाहेर निघायला सांगतात. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे नेहमी असे विनोदी व्हिडिओज बनवत राहतात आणि शेअर करत राहतात.