जुही चावला यांना पहिल्या नजरेत नव्हते आवडले शाहरुख खान, अभिनेत्याला बघून तोंड केले वाकडे !!

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आणि किंग खान नावाने लोकप्रिय असलेले शाहरुख खान यांची जोडी पडद्यावर खूप पसंत केली जात होती. या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खान यांना पहिल्यांदा जुही चावलाने बघून तोंड वाकडे केले होते. जुहीला शाहरुख काहीच आवडला नव्हता.

‘ राजू बन गया जेंटलमॅन ‘ चित्रपटाचा किस्सा
एका जुन्या व्हिडिओत जुही आणि शाहरुख हे सोबत बसलेले आहेत आणि अभिनेत्री चित्रपट ‘ राजू बन गया जेंटलमॅन ‘ च्या चित्रीकरणाबद्दल बोलत असते. जुहीने सांगितले की त्यांनी ‘ कयामत से कयामत तक ‘ चित्रपटात ज्यामधे त्यांच्यासोबत आमिर खान होते. हा चित्रपट केल्यानंतर त्यांना ‘ राजू बन गया जेंटलमॅन ‘ ची स्क्रिप्ट मिळाली जी त्यांना खूप आवडली.

चित्रपटाची गोष्ट ऐकल्यानंतर जुही यांनी सह कलाकाराबद्दल विचारले. चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की त्याने ‘ फौजी ‘ चित्रपटात काम केले आहे. मात्र जुही ने ती मालिका बघितली नव्हती. तेव्हा निर्माते त्यांना म्हणाले की ते आमिर सारखे दिसतात. हे ऐकून जुही आनंदी झाल्या.

जुही यांना आवडले नव्हते शाहरुख
जुही यांनी व्हिडिओत सांगितले की जेव्हा त्या सेटवर गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की एक लुकडा सा, सावळा सा आणि लांब केसावाला व्यक्ती उभा आहे, जो कोणत्याही पद्धतीने आमिर खान दिसत नव्हता. जुही ने सांगितले की त्यांना पाहिल्यानंतर मला वाटले की मी आता मागे फिरू शकत नाही कारण त्यांनी चित्रपट साइन केला होता.

जुही आणि शाहरुख या जोडीने केली कमाल
जुही ने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले की त्यांना शाहरुख सोबत काम करायला मजा आली. ते जरी नवीन असतील तरी त्यांच्या आत आत्मविश्वास भरपूर होता. नंतर शाहरुख खान व जुही चावला या जोडीने ‘ डर ‘, ‘ यस बॉस ‘, ‘ फिर भी दिल हैं हिंदुस्तानी ‘ , ‘ वन टू का फोर ‘ , ‘ राम जाने ‘ यांसारख्या चित्रपटात काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.