मोलकरणीच्या आरोपानंतर ‘ या ‘ कलाकाराची उध्वस्त झाली कारकीर्द ! काम देण्यासाठी तयार नाहीत दिग्दर्शक..

सन 2003 मध्ये आलेला चित्रपट ‘हजारों ख्वाहिशें ऐसी ‘ हा बघितल्यानंतर असे वाटले की बॉलिवूडला एक नवीन कलाकार मिळाला आणि या नवीन कलाकाराचे नाव होते शाइनी आहुजा. या चित्रपटासाठी अभिनेत्याला फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू हा पुरस्कार देखील दिला गेला. मात्र एका आरोपाने या कलाकाराची कारकीर्द उध्वस्त करून टाकली.

कारकिर्दीची झाली होती चांगली सुरुवात
15 मे 1975 मध्ये जन्मलेल्या शाइनी यांनी मॉडेलिंग पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पहिलाच चित्रपट ‘ हजारों ख्वाहिशें ऐसी ‘ मधून शाइनी बॉलिवूड मध्ये लोकप्रिय झाले. यानंतर शाइनी यांच्या खात्यात हिट चित्रपटांची रांग लागली. मात्र शाइनी यांचे हे चांगले दिवस जास्त दिवस टिकू शकले नाही.

मोलकरणीने लावला आरोप
सन 2009 मध्ये शाइनी यांच्या मोलकरणीनेच त्यांच्यावरच वाईट काम केल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या खटल्यात शाइनी आहुजा यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली गेली तथापि 2011 मध्ये ते बेल वर सुटून गेले.

शाइनी यांची संपुष्टात येणारी कारकीर्द
यानंतर शाइनी यांनी सन 2012 मध्ये चित्रपट ‘ घोस्ट ‘ पासून पदार्पण केले मात्र चित्रपटाला एवढा प्रतिसाद नाही मिळाला. यानंतर शाइनी पुन्हा जवळपास दोन वर्षापर्यंत कुठे दिसले नाही. लोक हळू हळू शाइनी यांना विसरू लागले होते मात्र सन 2015 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पदार्पण केले.

ते दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘ वेलकम बॅक ‘ या चित्रपटात दिसले गेले मात्र ही भूमिका एवढी छोटी होती की शाइनी यांच्यावर लोक लक्ष नाही देऊ शकले. तेव्हापासून ते मोठ्या पडद्यापासून गायब झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.