अभिनेत्री प्रियंका चोप्राने फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर हॉलिवूड मध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियंका आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील चर्चेत असते. प्रियंकाने अमेरिकन पॉप गायक निक जोनास सोबत लग्न करून सर्वांना चकित केले होते. तेच आता दोघांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. दोघांच्या मधील रोमँटिक केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. प्रियंकाने यादरम्यान आपल्या शरीरात होणाऱ्या बदला बद्दल बोलले आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे त्यांच्या शरीराला जज केले जाते. या गोष्टीबद्दल त्या चिंताग्रस्त होतात.
सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड चा किताब आपल्या नावावर करणारी प्रियंका चोप्रा आता 38 वर्षांची झाली आहे. हल्लीच प्रियंकाने Yahoo life ला दिलेल्या मुलाखतीत स्वतः बद्दल अनेक खुलासे केले आहेत. प्रियंकाने सांगितले, ‘ मी खोटं नाही बोलणार की मला या गोष्टीचा काही फरक नाही पडत. जसे जसे सर्वांच्या शरीरात बदल होतो, तसेच माझे शरीर देखील बदलले आहे आणि मानसिक रूपाने याचा स्वीकार करायचाच होता की ठीक आहे, आता माझे शरीर असे दिसत आहे, ते असेच आहे जसे आता मी दिसते. ठीक आहे, मी आता माझ्या आताच्या शरीरासोबत आहे ना की 10 किंवा 20 वर्षाच्या शरीरासोबत. ‘
प्रियंका या पुढे म्हणाल्या की, ‘ मला वाटते की हे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला आत्मविश्वास देतो की तुम्ही कसे दिसता यानंतर काय करू शकत आहात. मी नेहमी या गोष्टीबद्दल विचार करते की मी करू शकत आहे ? माझे उद्दिष्ट काय आहे ? आज मला जे काम मिळाले होते मी ते चांगल्याप्रकारे करू शकत आहे का ? ‘ प्रियंका चोप्रा अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. त्या नेहमी आपले नवीन फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत राहतात.