मुलगा रणबीर कपूर सोबत का नाही रहात नीतू कपूर ?? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

नीतू कपूर ची मुलगी रिद्धिमा कपूर दिल्लीत आपल्या सासरी आहे आणि रणबीर कपूर वेगळ्या अपार्टमेंट मध्ये राहतात. नेमके काय कारण आहे की नीतू कपूर पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर देखील रणबीर व रिद्धिमा सोबत नाही रहात ? याबद्दल खुलासा त्यांनी फिल्मफेअर ला दिलेल्या मुलाखतीत केला.

नीतू बोलल्या – हृदयात रहा माझ्यात डोक्यावर चढू नका
नीतू कपूर म्हणाल्या, ‘ मला असे वाटते की माझे मुल त्यांच्या आयुष्यात व्यस्त रहावे. मी त्यांना म्हणते की माझ्या हृदयात रहा, माझ्या डोक्यावर चढू नका. ‘

रिद्धिमा सोबत राहिल्यावर नीतू यांना आला होता ताण
30 एप्रिल ला नीतू कपूर यांचे पती आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. तेव्हा मुलगी रिद्धिमा, नीतू कपूर यांच्यासोबत मुंबईमध्ये रहात होती. तथापि, नीतू यांना वाटत होते की रिद्धिमा पुन्हा आपल्या सासरी दिल्लीला चालल्या जावे आणि आपल्या पतीसोबत रहावे. त्यादरम्यान त्या रिद्धिमा बद्दल खूप चिंतेत होत्या.

‘ मला एकांत आवडतो ‘
नीतू कपूर म्हणाल्या, ‘ जेव्हा लॉकडाऊनच्या वेळेस रिद्धिमा माझ्या सोबत रहात होती तेव्हा मी एक वर्षापर्यंत ताणात होते. मी अस्वस्थ होत होते आणि रिद्धिमा ला म्हणत होते की तू वापस चालल्या जा, भरत एकटा आहे. म्हणजे मी तिला पळवत होती. मला माझा एकांत आवडतो. मला अशाप्रकारे जगायला आवडते. ‘

मुलांपासून दूर राहण्याची सवय झाली होती
नीतू कपूर म्हणाल्या की त्यांना मुलांपासून दूर राहण्याची सवय झाली होती. त्या बोलल्या, ‘ मला आता देखील लक्षात आहे की जेव्हा रिद्धिमा शिक्षणासाठी लंडन गेली होती तेव्हा मी अनेक दिवस रडली होती. रिद्धिमा चा कोणताही मित्र येतो आणि बाय म्हणून चालल्या जातो तरी देखील मी रडत होते.

मग काही वर्षानंतर जेव्हा रणबीर गेला तेव्हा मी रडले नाही. त्यावेळी रणबीर म्हणाला की आई तू माझ्यावर प्रेम नाही करत. मात्र असे काही नाही आहे. फक्त असे समज की त्यावेळी मला तसे आयुष्य जगायची सवय झाली होती. मुलांपासून दूर राहण्याची सवय झाली होती. म्हणून जेव्हा रणबीर कपूरच्या वेळी असे पुन्हा झाले तेव्हा मी तयार होते.

Leave a Reply

Your email address will not be published.