अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी शनिवारी म्हणजेच 8 मे ला आपल्या तिसऱ्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. जुलै 2020 पासून दोघे लंडन मध्ये आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सोनम यांच्या प्रपोजल कहाणीबद्दल सांगतो. 2018 मध्ये एका टॉक शो मध्ये अभिनेत्रीने सांगितले होते की आनंद ने मोठ्या प्रपोजल ची तयारी केली होती. त्यांनी गुडघ्यावर बसून आश्चर्यचकित करून टाकले होते मात्र अभिनेत्रीचा दिवस चांगला नव्हता.
सोनमच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांना खूप वाईटपणे पीएमएस होत होता. ती यामुळे देखील नाराज होते की कारण तिचा आवडता चष्मा हरवला होता. सोनम ने सांगितले होते की आनंद ने त्यांना Pilates class मधून आणले आणि त्या खूप नाराज झाल्या.
सोनमने लगेच दिला होकार
सोनमच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासाठी हा दिवस चांगला नव्हता आणि ती न्यूयॉर्कच्या लोकांची तक्रार करत होती जेव्हा आनंद आपल्या सायकल वरून उतरले, गुडघ्यावर बसले आणि त्यांना विचारले की तुम्ही माझ्याशी लग्न करणार का ? यावर सोनम ने लगेच होकार दिला आणि ती पण गुघ्यावर बसली.