इलियाना डिक्रुज ने खरच केला होता गर्भपात ?? अभिनेत्रीने सांगितले सत्य..

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुज आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. या दिवसात इलियाना आपल्याबद्दल अफवा ऐकून खूप हैराण आहे. बातम्यांनुसार एका मुलाखतीत इलियाना ने सांगितले की त्यांच्याबाबतीत खोटी बातमी पसरवली जात आहे की ती गरोदर होती आणि यामुळे तिने गर्भपात केला.

बातम्यांनुसार इलियाना म्हणाली की काही लोक आहेत जे अफवा पसरवतात त्यामधून एक अफवा माझ्या गरोदरपणाची आणि गर्भपाताची होती. लोक अशाप्रकारच्या बातम्या लिहितात हे खूप दुखद आहे. एवढेच नाही तर हे देखील लिहिले आहे की मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र माझ्या मोलकरणीने मला वाचवले होते.

इलियाना म्हणाली की, माझी कोणीच मोलकरीण नाही आहे आणि मी जिवंत आहे. मग यासारख्या बातम्या बनतात तरी कशा ? मला नाही माहित की त्यांना या बातम्या भेटतात तरी कुठून.

2018 मध्ये देखील इलियाना आणि तिच्या प्रियकरा बद्दल बातम्या पसरत होत्या. तथापि, इलियाना ने इंस्टाग्राम वर याबद्दल पोस्ट करून याचे खंडन केले होते. काही दिवसांपूर्वीच इलियाना ने खुलासा केला होता की ती वयाच्या 12 वर्षापासूनच बॉडी शेमिंग ची शिकार होत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.