प्रियंका चोप्रा च्या लग्नाअगोदर आठ मुलींना निक जोनास ने केले होते डेट !!

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे एकमेकांचे झाले आहेत. मागच्या काही दिवसात प्रियंकाचा कल बॉलिवुड सोडून हॉलिवूड कडे जास्त वाढला आहे आणि आपला जोडीदार देखील त्यांनी परदेशातून निवडला आहे जो त्यांच्यापासून वयाने खूप लहान आहे. निक जोनास हृदय हातावर घेऊन फिरणारा व्यक्ती आहे आणि प्रियंकाच्या अगोदर काही महिलांसोबत देखील त्यांचे नाव जोडले गेलेले आहे.

10 वर्षांनी लहान आहे निक
प्रियंका आणि निक यांच्यात 10 वर्षांचे अंतर आहे. प्रियंका 36 वर्षांची आहे आणि निक 26 वर्षांचा. या दिवसात रोमांन्स किंवा लग्न मध्ये वयाच्या अंतराचा फारसा फरक पडत नाही.

14 वर्षांनी मोठी असलेल्या महिलेला देखील केले आहे डेट
रोमांन्सच्या बाबतीत निक हृदय हातावर घेऊन फिरतात. वयाच्या 25 व्या वर्षीच निकला रोमांन्सचा विशेष अनुभव आहे आणि त्यांनी आपल्या वयापेक्षा 14 वर्षांनी मोठी असलेल्या महिलेला देखील डेट केले आहे.

माइली सायरस, केट हेडसन, सेलेना गोमेझ राहिल्या आहेत प्रियसी
एका अमेरिकन वेबसाईट नुसार प्रियंकाच्या अगोदर निक ने आठ मुलींना डेट केले आहे. यामध्ये माइली सायरस, केट हेडसन, सेलेना गोमेझ, डेल्टा गुड्रेम, केंडल जेनर, लिविया कल्पो आणि लीली कॉलिन्स सामील आहेत. वयाच्या 14 व्या वर्षातच निकला, माइली सायरस वर प्रेम झाले. कोणाशी काही दिवस तर कोणाशी काही महिने च त्यांचे अफेयर चालले आणि मग ब्रेकअप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.