प्रियंका पासून ते सेलिना पर्यंत…’ या ‘ बॉलिवूड अभिनेत्रींनी निवडला परदेशी जोडीदार !!

बॉलिवुड मधील अभिनेत्रींया आणि परदेशी मुलांसोबत रोमांन्स आणि मग रोमांन्सनंतर लग्नाची प्रक्रिया काही नवीन नाही आहे.

प्रियंका चोप्रा
प्रियंकाने निक सोबत लग्न करून हे सिद्ध केले आहे की प्रेम कधीही आणि कोणाशीही होऊ शकते. प्रियंका आणि निक यांची भेट 2017 मध्ये झाली होती, यानंतर दोघांमध्ये जवळपणा वाढला. दोघांनी एक डिसेंबर ला ख्रिश्चन पद्धतीनंतर 2 डिसेंबर ला भारतीय पद्धतीने लग्न केले.

माधुरी दीक्षित
प्रियंका चोप्रा शिवाय बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्रींया आहेत ज्यांनी त्यांचा जोडीदार सातासमुद्रापार मिळाला आहे. बॉलिवुड ची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे नाव असे तर संजय दत्त यांच्यासोबत जोडले गेले मात्र त्यांनी विदेशात राहणाऱ्या भारतीय मुळाचे डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्यासोबत केले.

प्रीती झिंटा
बॉलिवूड ची डिंपल गर्ल प्रीती झिंटा ने आपल्या जोडीदाराच्या रुपात एका परदेशी ला निवडले आहे. अमेरिकेचे गुंतवणूक बँकर जीन गुडइनफ सोबत काही दिवस नातेसंबंधात राहिल्यानंतर सन 2016 मध्ये प्रीती ने त्यांच्यासोबत लॉस एंजेलिस मध्ये भारतीय पद्धतीने लग्न केले होते.

सेलिना जेटली
बॉलिवूड मध्ये आपले सौंदर्य पसरवणारी अभिनेत्री सेलिना जेटली यांना त्यांचे प्रेम सातासमुद्रापार मिळाले. सेलिना ने सन 2011 मध्ये व्यावसायिक पीटर हॉग सोबत लग्न केले. दुबईमध्ये सेलिना पहिल्यांदा पीटर ला भेटली होती. पीटर दुबई आणि सिंगापूर मध्ये हॉटेल्स चे मालक आहेत. सेलिना ने 2003 मध्ये जानशीं चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि लग्नानंतर चित्रपटात काम करणे सोडून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.