स्वप्नसुंदरी राखी सावंत मागच्या काही दिवसापासून निरंतर चर्चेत आहे. कधी आपल्या विधानांमुळे तर कधी आपल्या जीवनशैली मुळे. राखी सावंत आपले खाजगी आयुष्य देखील चाहत्यांसमोर एखाद्या पुस्तकासारखे खुले करून देते. हल्लीच त्यांच्या आईची शस्त्रक्रिया झाली आहे. राखीच्या चाहत्यांनी त्यांच्या आईसाठी प्रार्थना केली आहे. राखी नेहमी आपल्या आईच्या शस्त्रक्रियेबद्दल चाहत्यांना सांगत होती. त्याच दरम्यान तिने आपला पती रितेश बद्दल मोठा खुलासा केला आहे.
असहाय्यतेत केले होते लग्न
आपल्या या नवीन विधानानंतर राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस तिने आपल्या पतीच्या नातेसंबंधाच्या बाबतीत खुलासा केला आहे. तिने सांगितले की रितेश कडून राखीच्या आईने उपचारासाठी पैसे घेण्यास नकार दिला होता. तिने रितेश ला ‘ व्हॉट्सॲप मित्र ‘ म्हणले आणि खुलासा केला की तिने रितेश सोबत असहाय्यतेने लग्न केले होते. राखी यांच्या मागे एक गुंडा लागला होता ज्यामुळे तिने रितेश सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रेम नाही तरी केले लग्न
आधी पण एका वेबसाईटशी बोलताना राखी सावंत ने आपल्या लग्नाबद्दल म्हणाल्या होत्या की, ‘ रितेशनेच माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती. कोणीतरी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आणि मला सांगितले होते की जर लग्न नाही केले तर आम्ही तुला मारून टाकू.