चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेनंतर दक्षिणात्य अभिनेत्री रीजा विल्सन चा बिघडला चेहरा !! तसेच ‘ या ‘ बॉलिवूड अभिनेत्रींना देखील शस्त्रक्रिया करणे पडले महाग..

बॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेसोबतच आता सामान्य आयुष्यात सुंदरता असणे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र अनेकवेळा चांगले घेण्याच्या इच्छेपायी चेहऱ्याची शस्त्रक्रिया करणे लोकांना महाग पडले आहे. हल्लीच दक्षिणात्य अभिनेत्री रीजा विल्सन यांच्यासोबत असेच काहीतरी झाले जेव्हा चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या डोळ्याखाली सूज बरीच आली. चेहरा व शरीराची सुंदरता वाढवण्यासाठी रीजा यांच्या अगोदर अनेक अभिनेत्रींनी कॉस्मेटिक आणि चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेचा आधार घेतला आहे. यामधून काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने लोकांचे कौतुक मिळवले तर काही अशा देखील आहेत ज्यांनी बिघडलेल्या शस्त्रक्रियेमुळे स्वतःचा विनोद केला. चला तर बघुया कोणत्या आहेत त्या अभिनेत्री –

कोएन मित्रा
बॉलिवूड मधील ‘ साकी साकी ‘ गाण्याने लोकप्रिय झालेली अभिनेत्री एकेकाळी लोकप्रिय आयटम गर्ल होती. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीच्या पीक पॉईंट्स मध्ये भुवया व नाकाची शस्त्रक्रिया केली होती जी पूर्णपणे बिघडली. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला ओळखणे कठीण झाले होते. हळू-हळू अभिनेत्री चित्रपटापासून दूर झाली. अभिनेत्री बिगबॉस 13 मध्ये देखील दिसली होती जिथे तिची बोटॉक्स शस्त्रक्रिया स्पष्टपणे दिसत आहे.

नोरा फतेही
शस्त्रक्रियेने चेहरा व शरीरात बदल करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ताजे नाव नोरा फतेही चे आहे. अभिनेत्रीने हल्लीच कुल्हे व स्तनाचे रोपण केले आहे. अभिनेत्री काही दिवसांअगोदर इंडियाज बेस्ट डान्सर या मालिकेत न्यायाधीश म्हणून दिसली होती जिथे तिच्या शरीरातील बदल स्पष्टपणे दिसला गेला होता. काही फोटोज् समोर आल्यानंतर अभिनेत्रीला याबद्दल खूप टीका केल्या गेली.

वाणी कपूर
चित्रपट ‘ शुद्ध देसी रोमांन्स ‘ पासून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या वाणी कपूरच्या चेहऱ्यात अचानकपणे मोठा बदल दिसल्या गेला. तो बदल होता तिच्या ओठांचा आकार, जे शस्त्रक्रियेनंतर खूप मोठे झाले होते. चित्रपट ‘ बेफिक्रे ‘ मध्ये तिचे ओठ बघून खुप टीका केली गेली होती, काही लोक तिला बदल म्हणून देखील संबोधत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.