बॉलिवूड मधील अनेक कलाकार आपल्या चित्रपटांबरोबरच खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहतात. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या खाजगी आयुष्यात एकमेकांना घटस्फोट दिल्यामुळे चर्चेत राहिले आहेत. काही कलाकार असे देखील आहेत ज्यांनी लग्नाच्या अगदी काही काळानंतरच एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तसेच काही असे देखील आहेत जे बऱ्याच काळापर्यंत एकमेकांसोबत राहिले आणि नंतर मग वेगळे झाले. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील त्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा घटस्फोट हा खूप चर्चेत राहिला…
करिश्मा कपूर आणि संजय कपूर
बॉलिवूड मधील अभिनेत्री करिश्मा कपूर एकेकाळची चर्चित अभिनेत्री राहिली आहे. त्यांनी दिल्ली चे व्यावसायिक संजय कपूर सोबत 2003 मध्ये लग्न केले होते, मात्र या दोघांनी नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सन 2006 मध्ये घटस्फोट घेतला. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे दोन मुले समायारा आणि कियान आहेत. तेच घटस्पोटानंतर संजय यांनी आपली प्रियसी प्रिया सचदेव सोबत लग्न केले होते.
सैफ अली खान आणि अमृता सिंह
हे बॉलिवूड मधील चर्चित जोड्यांपैकी एक होते. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी सन 1991 मध्ये लग्न केले होते. अमृता, सैफ अली खान पेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. मात्र, काही काळानंतर दोघांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खान आणि अमृता सिंह ने सन 2004 मध्ये घटस्फोट घेतला.
दिया मिर्झा आणि साहिल सांगा
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ने सन 2004 मध्ये साहिल सांगा सोबत लग्न केले होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांनी मागच्या वर्षी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दिया मिर्झा ने आपल्या घटस्फोटाची माहिती सोशल मीडियावर दिली होती.