बॉलिवूड अभिनेत्री योगिता बाली यांचे सुंदर डोळे व चेहऱ्यावरील हसू ही त्यांची ओळख होती. योगिता ने 1971 मध्ये ‘ परवाना ‘ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अजनबी, अपराधी, कुंवारा बाप, महबुबा आणि जानी दुश्मन सारख्या चित्रपटात काम केले. एवढ्या चांगल्या चित्रपटात काम केल्यानंतर देखील योगिता आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली.
योगिता बाली शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली ची भाची होती. बॉलिवूड मध्ये त्यांच्या चाहणाऱ्यांची काहीच कमी नव्हती. असे असूनही, त्यांना जास्त करून त्या चित्रपटात बघितले गेले, ज्यांना प्रथम श्रेणीच्या अभिनेत्रींनी नाकारले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट दिग्दर्शकांनी योगिता ला ठळक प्रतिकेच्या रुपात प्रस्तुत केले होते.
एकेकाळी योगिता बाली यांना चित्रपट ‘ जुमना के तीर ‘ मध्ये किशोर कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट तर अपूर्णच राहिला मात्र किशोर कुमार यांच्या चांगल्या स्वभावाला भुरळ पडून लगेच लग्न केले. मात्र नशिबाला तर काहीतरी दुसरेच मान्य होते. 1976 मध्ये झालेले लग्न 1978 मध्ये मोडले. असे सांगितले जाते की याचे कारण योगिता यांच्या आईचे दैनंदिन जीवनात जास्त दखल देणे. यादरम्यान मिथुन चक्रवर्ती बॉलिवूड मध्ये वर आले होते. मिथुन सोबत योगिता यांचा चित्रपट ‘ ख्वाब ‘ चे चित्रीकरण चालू होते. मिथुन यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यांना देखील पत्नीची गरज भासत होती. मग काय, दोघे एकमेकांना भेटले आणि लग्न केले. यामुळे किशोर कुमार जास्त नाराज झाले व त्यांनी मिथुन यांच्या चित्रपटात गाणे नाही गायले.