चित्रपटात काम करताना ‘ या ‘ अभिनेत्रीचे केले होते अपहरण !! अल्पशा पैशांसाठी मित्राने केली होती हत्या..

मीनाक्षी थापा च्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना चकित केले होते. तिचे अपहरण करून डोकं शरीरातून वेगळे केले होते. अल्पशा पैशांसाठी त्या वेळी त्यांना मारल्या गेले होते. जेव्हा ती करीना कपूर अभिनेत्री असलेल्या ‘ हिरोईन ‘ चित्रपटात काम करत होती. तेव्हा अभिनेत्री करीना कपूर चित्रपट ‘ हिरोईन ‘ मध्ये काम करत होती.

मीनाक्षी ने सन 2011 मध्ये भयानक चित्रपट ‘ 404 ‘ पासून आपल्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर सन 2012 मध्ये त्यांना करीना कपूर खान आणि अर्जुन रामपाल असलेला चित्रपट ‘ हिरोईन ‘ मध्ये तिला काम मिळाले मात्र याच दरम्यान तिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर तिची हत्या केली गेली. मीनाक्षी थापा चे चित्रपट ‘ हिरोईन ‘ मध्ये लहान व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अमित जैस्वाल आणि त्यांची प्रियसी प्रीती सुरिन यांनी अपहरण केले होते.

खरंतर, अमित आणि प्रीती ने मीनाक्षी ला अपहरण करून तिच्या आईकडून 15 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांनी मीनाक्षी च्या आईला धमकी दिली की जर त्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर त्यांच्या मुलीकडून प्रौढ चित्रपटात काम करायला लावू. ज्यानंतर मीनाक्षी च्या आईने त्यांना 60 हजार रुपये दिले मात्र नंतर गोरखपूर मध्ये त्या अभिनेत्रीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आणि तिचे डोके शरीरापासून वेगळे केले.

यानंतर दोघांनी मिळून मीनाक्षीच्या शरीराला पाण्यात फेकून दिले आणि मुंबईला जाताना चालत्या बसमधून तिचे डोकं फेकून दिले. तथापि, नंतर सिम कार्ड आणि मोबाईलच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली ज्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला.

अमित आणि त्यांची प्रियसी प्रीती वर आयपीसी कलम 302 ( हत्या ) आणि 364 – ए ( पैशांसाठी अपहरण करणे ) च्या अंतर्गत खटला चालला होता आणि घटनेच्या जवळपास 6 वर्षानंतर सन 2018 मध्ये न्यायालयाने दोघांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.