‘ कपडे काढ, जेणेकरून मला बघता येईल की या भूमिकेसाठी तू योग्य आहेस की नाही ‘, कास्टिंग काउच वर ईशा अगरवाल चा खुलासा..!

बॉलिवूडच्या चमचमत्या जगात काही रहस्य असे आहेत जे बेपर्दा झाले आहेत, मात्र बदलले नाही आहेत. ग्लॅमर ने भरलेल्या या जगाचे एक सत्य आहे कास्टिंग काउच ज्याचा त्रास अनेक कलाकारांनी सहन केला आहे. नेहमी कोणता ना कोणता कलाकार आपले कास्टिंग काउच शी संबंधित अनुभव शेअर करतो. हल्लीच ‘ कहीं हैं मेरा प्यार ‘ चित्रपटाची अभिनेत्री ईशा अगरवाल ने देखील कास्टिंग काउच ची गोष्ट सांगितली

‘ मिस ब्यूटी टॉप ऑफ द वर्ल्ड 2019 ‘ चे शीर्षक जिंकलेल्या ईशा अगरवाल ने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. त्या म्हणाल्या की, ‘ मनोरंजन जगतात माझा प्रवास हा सोपा नाही राहिला. मला यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लातूर सारख्या लहान शहरातून येणे आणि मुंबईत नाव बनवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही आहे. ‘

कास्टिंग काउच वर बोलताना ईशा म्हणाल्या की, ‘ हे आज देखील सत्य आहे. जेव्हा मी मुंबई मध्ये नवीन नवीन आली होते तर एका कास्टिंग व्यक्तीने मला आपल्या कार्यालयात बोलावले होते. जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत त्याच्या कार्यालयात पोहचली तर तो म्हणाला की त्याने अनेक मोठमोठ्या कलाकारांना का केले आहे आणि मला देखील तो चांगला प्रकल्प देईल. ‘

पुढे ईशा म्हणाल्या की, ‘ अचानकपणे तो मला म्हणाला की मी माझे कपडे काढावे कारण त्याला माझे अंग बघायचे होते. याचे कारण त्याने सांगितले की तो माझ्या अंगाला पाहून सांगेल की मी त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही. मी लगेच त्याचा प्रस्ताव नाकारला आणि आपल्या बहिणीसोबत बाहेर निघून आली. त्याने मला अनेक दिवस मेसेज देखील पाठवले मात्र नंतर मी त्याला ब्लॉक केले. ‘

एवढेच नाही तर ईशाने अभिनेता-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबई येणाऱ्या लोकांना सल्ला देखील दिला आहे. त्या म्हणाल्या की, ‘ तुम्हाला अनेक लोक भेटतील जे म्हणतील ते मोठ्या कास्टिंग कंपनी मधून आहेत त्यांच्यापासून वाचून रहावे. ते तुम्हाला अनेक प्रस्ताव देतील, परंतु सापळ्यापासून तुम्हाला वाचायचे आहे. नेहमी योग्य विचार करून निर्णय घ्यावा, जर तुमच्यात क्षमता असेल तर कोणत्याच तडजोडी शिवाय तुम्हाला यश नक्की मिळेल.’

Leave a Reply

Your email address will not be published.