बॉलिवूड मधील ‘ या ‘ लोकप्रिय गायकांनी केले आहेत दोन लग्न !! तर एका गायकाचे 37 वर्षाने लहान असलेल्या मुलीसोबत जोडले गेले नाव…

असे म्हणतात की जोड्या देव बनवतो. कदाचित हेच कारण आहे की अनेकवेळा खूप प्रयत्न करून देखील नाते चालत नाही. असेच काही चित्रपटांतील कलाकारांसोबत देखील झाले आहे. तसेच आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक गायक आहेत ज्यांनी एक नाही अनेक लग्न केले आहेत. चला तर मग बोलूया त्या गायकांबद्दल ज्यांनी केले आहेत एकापेक्षा जास्त लग्न…

हिमेश रेशमिया
बॉलिवूड गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया खूप चर्चेत राहतात. मग ते त्यांचे व्यावसायिक आयुष्य असो किंवा खाजगी आयुष्य, ते लाइमलाइट मध्ये राहतात. हिमेश रेशमिया ने दोन लग्न केले आहेत. हिमेश ने सन 2017 मध्ये आपल्या 22 वर्ष जुन्या लग्नाला संपवले होते. यानंतर सन 2018 मध्ये हिमेश ने आपल्या जास्त वेळापासून राहिलेल्या प्रियसी सोबत लग्न केले.

उदित नारायण
बॉलिवूड मधील दिग्गज गायक उदित नारायण यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण्याअगोदरच रंजना नावाच्या महिलेसोबत लग्न केले होते. मुंबईत येऊन चांगले नाव कमवून उदित यांनी दीपा नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. दीपा नेपाळच्या होत्या आणि बॉलिवूड मध्ये नाव कमावण्यासाठी त्या दिवसात संघर्ष करत होत्या. पहिल्या पत्नीला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा त्यांनी खूप हंगामा देखील केला होता. सध्या उदित आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहतात.

अरिजीत सिंह
आपल्या आवाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे गायक अरिजीत सिंह यांनी देखील दोन लग्न केले आहेत. अरिजीत यांनी आपल्या लहानपणीची मैत्रीण कोयल राय सोबत सन 2014 मध्ये लग्न केले होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते. याअगोदर त्यांनी एका मालिकेतील त्यांची सह-कलाकार सोबत लग्न केले होते. अरिजीत सिंह यांची बायको आधीपासूनच विवाहित होती. विवाहित आयुष्यात अडचणींमुळे कोयल ने पहिल्या पती ला घटस्फोट दिला आणि अरिजीत सिंह सोबत लग्न केले.

मोहम्मद रफी
दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आयुष्यात दोन महिला आल्या होत्या. त्यांनी अगदी कमी वयात पहिले लग्न केले होते. आपल्या लग्नाची गोष्ट त्यांनी सर्वांपासून लपून ठेवली होती. या लग्नाबद्दल फक्त दोघांच्या कुटुंबांना माहित होते. 1994 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी रफी यांनी दुसरे लग्न बिलकिस सोबत केले होते.

अनुप जलोटा
भजन सम्राट आणि गायक अनुप जलोटा यांनी देखील तीन लग्न केले आहेत. अनुप यांनी तिसरे लग्न मेधा गुजराल सोबत केले आहे, जी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांची भाची होती. अनुप जलोटा यांनी पहिले लग्न सोनाली सेठ सोबत केले होते जी त्यांची विद्यार्थिनी होती. यानंतर अनुप जलोटा यांनी दुसरे लग्न बिना भाटिया सोबत केले होते. तेच बिगबॉस पर्व 12 मध्ये त्यांचे नाव जसलीन सोबत देखील जोडले गेले होते जी वयामध्ये त्यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान होती.

Leave a Reply

Your email address will not be published.