मोठा ब्रेक मिळण्याअगोदर ‘ या ‘ अभिनेत्रींनी केले आहे बी – ग्रेड चित्रपटांमध्ये काम, दया भाभी चा देखील आहे या यादीमध्ये समावेश !!

चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख बनवणे अत्यंत कठीण असते. कोणाला रातोरात नाव मिळते तर कोणी दिवस रात्र कष्ट करतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी दूरदर्शन सृष्टीत नाव बनवण्याअगोदर बी – ग्रेड चित्रपटात देखील काम केले आहे. या यादीमध्ये दूरदर्शनवरील सर्वात चर्चीत अभिनेत्रीया आहेत आणि आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.

रश्मी देसाई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई ने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘ उतरन ‘ मलिकेपासून तिला ओळख मिळाली. या व्यतिरिक्त ‘ नच बलिये ‘ चा देखील भाग होती. शेवटच्या वेळी ती मालिका ‘ दिल से दिल तक ‘ मध्ये दिसली होती. अभिनेत्री ने मालिकेमध्ये येण्याअगोदर बी – ग्रेड चित्रपट ‘ ये लम्हे जुदाई के ‘ आणि भोजपुरी चित्रपटांमधे काम केले होते.

अर्चना पूरन सिंह
विनोदी कार्यक्रम ‘ श्रीमान श्रीमतीजी ‘ , ‘ जाने भी दो पारो ‘ , ‘ कॉमेडी सर्कस ‘ आणि आता ‘ द कपिल शर्मा शो ‘ मध्ये जज म्हणून अर्चना पूरन सिंह ने घराघरात आपली ओळख बनवली आहे. अर्चना ने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र चित्रपट सृष्टीत येण्याअगोदर अर्चना देखील बी – ग्रेड चित्रपटांचा भाग होती.

दिशा वकानी
दूरदर्शन वरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानी, जिच्या शिवाय ‘ तारक मेहता का उलटा चष्मा ‘ प्रेक्षकांना अपूर्ण वाटतो. तिचे नाव देखील या यादीमध्ये सामील आहे. सर्वांची आवडती दया बेन म्हणजेच दिशा वकानी ने देखील आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बी – ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने चित्रपट ‘ कमसिन- द अनटच्ड ‘ मध्ये काम केले होते. एवढेच नाही तर तिने या चित्रपटामध्ये अनेक हॉट सीन्स देखील दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.