आई होणार आहे दिया मिर्झा !! दीड महिन्यांपूर्वी केले होते दुसरे लग्न..

2021 च्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामधे दिया मिर्झाचा देखील समावेश होता. तथापि 15 फेब्रुवारी ला लग्न करणाऱ्या दिया मिर्झा चे हे दुसरे लग्न होते, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. मात्र आता हल्लीच दिया च्या गरोदरपणाच्या घोषणेने चाहत्यांना चकित केले आहे.

बेबी पंप चा फोटो केला शेअर
दिया मिर्झा लवकरच आई होणार आहे, ज्याची घोषणा तिने आपल्या बेबी पंप सोबत फोटो शेअर करताना केली आहे. खरंतर दिया मिर्झा ने एक अत्यंत सुंदर फोटो इंस्टाग्राम वर ब्रिज वरचा एक फोटो शेअर केला आहे ज्यासोबत तिने प्रेमळ असे कॅप्शन देताना लिहिले की, ‘ पृथ्वी आई सारखाच मला देखील आशिर्वाद मिळाला आहे. आपल्या आतमध्ये ही भावना पेलताना मला खूप चांगले वाटत आहे. ‘ तोच फोटो व्हायरल झाल्यानंतर कलाकार जोडीला अभिनंदन देताना दिसत आहे.

दिया ने केले आहे दुसरे लग्न
दिया मिर्झा ने याच वर्षी दीड महिन्याअगोदर 15 फेब्रुवारी ला हैद्राबाद मधील व्यावसायिक वैभव रेखी सोबत लग्न केले होते. तसेच वैभव ची एक मुलगी देखील आहे. लग्नाबद्दल बोलायचे झाले तर लाल बनारसी साडीमध्ये दिया चा नवरी चा लूक जिथे लोकांना आवडला होता तिथेच कमी नातेवाईकांसोबत दिया चा अचानक लग्न करण्याच्या निर्णयाने लोकांना चकित केले होते.

सुट्टीवर आहे दिया मिर्झा
लग्नानंतर दिया या दिवसात आपले पती वैभव आणि त्यांच्या मुली सोबत मालदीव मध्ये सुट्ट्या घालवत आहेत. तसेच या सुट्टीवर तिने पती व मुलीसोबत काही फोटोज् देखील शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.