पूजा पासून ते सैफ-आमिर पर्यंत…या बॉलिवूड कलाकारांनी केले आहे वयाच्या 40 वर्षानंतर लग्न !!

असे म्हणतात की प्रेम करण्याचे वय नसते, म्हणून यामुळे बॉलिवूड चे काही कलाकार असे आहेत ज्यांना वयाच्या 40 वर्षानंतर आपला खरा आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. अभिनेत्री पूजा बत्रा ने 43 व्या वर्षी नवाब शाह सोबत सात फेरे घेतले आहेत. पूजा बत्रा चे हे दुसरे लग्न आहे. याअगोदर 2002 मध्ये तिने सर्जन डॉक्टर सोनू आहलुवालिया सोबत लग्न केले होते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी 40 वर्षानंतर आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला.

सैफ अली खान
40 वर्षानंतर सैफ अली खान ने करीना कपूर सोबत दुसरे लग्न केले आहे. सैफ आणि करीना यांच्या वयामध्ये जवळपास 13 वर्षांचे अंतर आहे. तेच सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह त्यांच्यापेक्षा 12 वर्षांने मोठी होती.

आमिर खान
बॉलिवूड अभिनेते आमिर खान खूप वेळापर्यंत किरण राव ला डेट केल्यानंतर 40 व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. याअगोदर आमिर ने रीना दत्ता सोबत 21 व्या वर्षी लग्न केले होते.

जॉन अब्राहम
जॉन अब्राहम ने प्रिया रुंचाल सोबत 2014 मध्ये गुप्तपणे लग्न केले होते. लग्नाच्यावेळी जॉन चे वय 41 वर्ष होते.

उर्मिला मातोंडकर
बॉलिवूड ची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर ने 41 व्या वर्षी कश्मीरी व्यवसायक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर सोबत लग्न केले होते. मोहसिन उर्मिला पेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.