‘ ही ‘ अभिनेत्री झाली वयाच्या 16 व्या वर्षी जुळ्या मुलांची आई, दीड वर्षात तुटले लग्न, आता मुले करून देणार आहेत दुसरे लग्न !!

दूरदर्शन अभिनेत्री आणि बिगबॉस 6 ची विजेती उर्वशी ढोलकिया एकटी आई आहे. ती सागर आणि क्षितिज या दोन्ही मुलांची आई आहे आणि ती एकटीने त्यांचा सांभाळ करत आहे. सागर आणि क्षितिज चे वय 25 वर्ष आहे. हल्लीच एका मुलाखतीत 41 वर्षाच्या उर्वशी ने खुलासा केला आहे की तिच्या मुलांना तिचे दुसरे लग्न करून द्यायचे आहे.

उर्वशी आपल्या मुलांच्या या गोष्टीवर म्हणाली की, ” हे जेव्हा होयचे असेल तेव्हा होईल, मी एक स्वतंत्र स्त्री आहे आणि मला माझ्या अटींवर आयुष्य जगणे पसंत आहे. जेव्हा पण कोणाला डेट करण्याची किंवा पुन्हा लग्न करण्याची गोष्ट घरात होते तेव्हा मी ते हसण्यावर घेते. ”

वयाच्या 15 व्या वर्षीच झाले होते लग्न
बातम्यांनुसार, वयाच्या 15 व्या वर्षीचे उर्वशीचे लग्न झाले होते. 16 व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झाली होती. मात्र लग्नाच्या दीड वर्षानंतरच ती आपल्या पतीपासून वेगळी झाली होती. तथापि, उर्वशीने कोणत्या व्यक्तीसोबत लग्न केले होते, याबद्दल माहिती उपलब्ध नाही झाली आहे.

कमोलिका बनून तयार केली ओळख
पतीपासून वेगळे झाल्यानंतर स्वतंत्र आई होऊन दोन्ही मुलांचा सांभाळ केला. उर्वशीने वयाच्या 6 व्या वर्षी जहिरातीमध्ये काम केले होते. यानंतर ती दूरदर्शन मालिका ‘ देख भाई देख ‘ मध्ये दिसली होती. असे तर उर्वशीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु तिला ओळख ‘ कसौटी जिंदगी की ‘ मालिकेमध्ये कामोलिकेची भूमिका साकारून मिळाली.

तिने ‘ घर एक मंदिर ‘, ‘ कभी सौतन कभी सहेली ‘, ‘ कहीं तो होगा ‘, ‘ कहाणी तेरी मेरी ‘, ‘ बेताब दिल की तमन्ना हैं ‘, ‘ बडी दूर से आये है ‘ सारख्या मालिकांमध्ये काम केले. एका वेबसाईट ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा उर्वशीचे आपल्या मुलांच्या करियर बद्दल म्हणणे आहे की ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले करियर बनवू शकतात, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.