‘ या ‘ कारणामुळे झाला होता दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ माल्ल्याचा ब्रेकअप !!

एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या हे दोघे संबंधात होते. मात्र दोघांचे नाते फार काळ टिकले नाही पण चर्चेत राहिले. दोघं कसे जवळ आणि का वेगळे झाले, याबद्दल दोघांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या.

दीपिका पादुकोण जेव्हा चित्रपट जगतात आली होती तर सुरुवातीलाच अभिनेता रणबीर कपूर सोबत तिचे अफेअर सुरू झाले होते. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे बऱ्याच दिवसापासून एकत्र संबंधात होते. दोघे सोबतच वेळ घालवत होते आणि सोबतच सुट्ट्यांमध्ये जात होते.

परंतु अचानक दोघांच्या ब्रेकअप ची बातमी आली. रणबीर कपूर सोबत ब्रेकअप नंतर दीपिका पादुकोण अनेक महिन्यांपर्यंत औदासिन्य राहिली होती आणि जेव्हा बरी झाली तेव्हा रणबीर वर धोका दिल्याचे अनेक आरोप लावले होते. रणबीर कपूर पासून वेगळे होऊन जेव्हा दीपिका पादुकोण डिप्रेशन मध्ये जात होती, त्याच दरम्यान सिद्धार्थ माल्ल्या तिच्या आयुष्यात आला होता.

दोघांची हळू हळू मैत्री झाली आणि मग नंतर दोघे जवळ आले. जेव्हा सिद्धार्थ बद्दल दीपिकाला विचारल्या गेले तेव्हा तिने मान्य केले की ती सिद्धार्थ सोबत संबंधात होती. दोघे पुरस्कार सोहळ्याला सोबत दिसले गेले आणि अनेक जागांवर दोघे सोबत दिसत होते. माध्यमांमध्ये दोघांच्या नाते संबंधाबद्दल अनेक बातम्या छापल्या गेल्या.

सिद्धार्थ माल्या सोबत ब्रेकअप नंतर दीपिका पादुकोण म्हणाली होती की – ‘ हे नाते वाचवण्याचे मी खुप प्रयत्न केले परंतु सिद्धार्थने अतिशय विचित्र पद्धतीने वागत होता. यामुळे मला या नात्याने काही चांगले भविष्य दिसत नव्हते.

तेच सिद्धार्थ माल्या म्हणाला होता की, जेव्हा कठीण काळ होता तेव्हा दीपिका पादुकोण ने साथ नाही दिली. मी जेव्हा महागड्या भेटवस्तू देत होतो, तिच्या मित्रांसाठी मोठी पार्टी देत होतो, ती ते दिवस विसरून गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.