सनी देओल का नाराज होते श्रीदेवी वर ? सनी देओल यांचे उत्तर ऐकून दंग राहून जाताल तुम्ही..!                               

सनी देओल पडद्यावर जरी एक रागीट आणि आक्रमक व्यक्तीची भूमिका साकारून लोकप्रिय झाले असतील, तरी खऱ्या आयुष्यात ते खूप शांत व लाजाळू स्वभावाचे आहेत. सेटवर ते कोणाशीच बोलत नाहीत. आपल्यातच ते हरवून जातात. पार्टीमध्ये ते जात नाहीत. पुरस्कार सोहळ्यात देखील जात नाहीत. मुलाखत द्यायला जास्त आवडत नाही. खूप सभ्यतेने कमी आवाजात ते बोलतात.

सनी देओल यांना फसवणुकीसारख्या गोष्टी आवडत नाहीत. अनेक चित्रपट त्यांनी या कारणामुळे सोडून दिले आहेत. परंतु जेव्हा अशाप्रकारच्या कलाकारांसोबत ते काम करतात तेव्हा त्यांना थोडा त्रास होतो.

एका मुलाखतीत सनी देओल यांना विचारल्या गेले की कोणत्या कलाकाराने त्यांना सर्वात जास्त त्रास दिला ? सुरुवातीला सनी देओल यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केली. मात्र नंतर जेव्हा उत्तर देण्यासाठी दबाव दिला गेला तेव्हा सनी देओल यांच्या तोंडून निघाले – श्रीदेवी. हे उत्तर ऐकून सर्वजण दंग झाले की नेमक श्रीदेवी कडून सनी देओल यांना काय अडचण होती ?

याचे कारण विचारले तर सनी देओल यांनी सांगितले की श्रीदेवी ह्या त्यांना खूप वाट बघायला लावत होत्या. सनी देओल सेटवर तयार होऊन शॉट देण्यासाठी बसलेले असायचे आणि श्रीदेवी सेटवर येण्यासाठी खूप वेळ लावत असायच्या. त्या मेकअप करत राहत असायच्या. म्हणून सनी देओल यांनी श्रीदेवी यांचे नाव घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.