तुमच्या जवळही पैसा टिकत नाही का ? करा हा उपाय….

प्रत्येक व्यक्तीच्या मनात आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला वाटत असते की आपला खिसा सतत पैशांनी भरलेला राहावा आणि आपणास पैशाची कमी कधीच भासू नये. आपल्याला सतत धनलाभ होत रहावा. परंतु, कायम एकसारखी परिस्थिती राहत नसते. आपण पैसे कसे आणि कुठे ठेवतो त्यावरून आपल्याकडे पैसे येतील किंवा नाही हे बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते, असे वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारे लोक म्हणत असतात.

आपण वास्तुशास्त्रानुसार पैसे कशाप्रकारे ठेवतो हे ते किती टिकणार किंवा वाढणार ते ठरवते. परंतु, हेच धन जर आपण निष्काळजी करत कोठेही आणि कसेही ठेवले तर ते आपल्याजवळ टिकतीलच असे नाही. त्यामुळे पैसे साठवण्यासाठी किंवा हाताळण्यासाठीचे नियम जाणून घेण्यासाठी वास्तुशास्त्र फायद्याचे ठरू शकते आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

वास्तु शास्त्रानुसार आपल्या पर्समध्ये काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. या वस्तु सोबत ठेवल्याने पैसे टिकत नाहीत आणि दूर निघून जातात अशी मान्यता आहे. यामुळे आपल्या खर्चातही वाढ होते. वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्यांचा परिणाम पैशांवर होतो ते पाहूया.

तुम्ही जर जुनी पावती खिशात किंवा आपल्या पर्समध्ये ठेवत आसाल तर ती तुमच्या पैशांसाठी योग्य गोष्ट नाही. असे केल्याने तुमच्या खिशात पैसे टिकत नाहीत. याने तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही जास्त असते. जुन्या कागदांवर राहूचा प्रभाव असल्याने त्याचा विपरित परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो.

खिशात ठेवल्या जाणाऱ्या पर्स किंवा वॉलेटमध्ये कधीही कोणतीच लोखंडाची वस्तु ठेवू नये. तसेच आपल्या पर्समध्ये औषधांच्या गोळ्या ठेवण्यानेही पैसे टिकत नाहीत. त्यामुळे अशा वस्तू ठेवणे टाळायला हवे. पर्स किंवा खिसा कधीच फाटका असता कामा नये. हे संकटाचे प्रतिक आहे. त्यामुळे ही आर्थिक संकट येऊ शकते.

घरात जर सुट्टे पैसे किंवा नाणी इकडे-तिकडे पडलेले असतील तर तुमच्यावर कर्ज वाढू शकते. त्यामुळे तुमचे पैसे व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. पर्समध्ये ठेवलेल्या नाण्यांचा आवाज यायला नाही पाहिजे. लक्ष्मीचा धनवर्षाव करतानाचा फोटो जर खिशात ठेवला तर, धनलाभ वाढण्यात मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.