‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ईशान आठवतोय का? 13 वर्षानंतर आता दिसतो आसा

आमिर खान ची स्टारर फिल्म ‘तारे जमीन पर’ 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात ईशान अवस्थीने सर्वांचे मन जिंकले होते. अगदी थोडक्यात सांगायचे तर, ते एक निरागस मूल होते,जे इतरांपेक्षा थोडे वेगळे होते. तो स्वतःच्या प्रश्नांमध्ये असतो. हे पात्र अभिनेता दर्शील सफारी ने साकारले होते. तेव्हा तो दहा वर्षांचा होता. आज म्हणजेच 9 मार्च 2021 रोजी दर्शिल 24 वर्षांचा झाला आहे. पहिल्याच सिनेमात दर्शीलने उत्तम अभिनय केला होता.

त्याने आपल्या पात्राला जीवंत केले होते. अशा परिस्थितीत, वाढदिवसाच्या निमित्ताने तो या 13 वर्षात किती बदलला आहे ,आणि तो कुठे आहे पाहूया. दर्शील आता मोठा झाला आहे. तो चित्रपट करत आहे. संगीत व्हिडिओही करत आहे. सन २०२० मध्ये टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनसोबत ‘प्यार नाल’ नावाचा त्यांचा व्हिओही प्रसिद्ध झाला आहे.

तो टीव्ही जगातही दिसला आहे. झलक दिखला जा च्या पाचव्या सत्रात तो स्पर्धक म्हणून दिसला होता. याशिवाय तो ‘ये है आशिकी’, ‘चल यार ट्राय मार’ यासारख्या टीव्ही मालिकांचादेखील भाग बनला आहे. तसेच द्रशीलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर एक्टर ‘तारे जमीन पर’ व्यतिरिक्त ‘बम बम बोले’, ‘झोककोमोन’ आणि ‘मिडनाइट चिल्ड्रेन’ मध्ये दिसला होता. शेवटच्या वेळी तो 2012 मध्ये बॉलीवूड प्रोजेक्टचा भाग होता.

मात्र, अद्याप त्याची ओळख ‘तारे जमीन पर’ चा ईशान अवस्थी म्हणून आहे. इतक्या लहान वयात इतके गंभीर पात्र साकारणे कोणालाही सोपे नसते. दहा वर्षांच्या मुलाकडून असे करणे देखील अपेक्षित नाही. पण दर्शील आपल्या अभिनयात परिपूर्ण होता. तो या चित्रपटाचा मुख्य अभिनेता होता आणि त्याच्या अभिनयाचा परिणाम असा होता की या चित्रपटाने जगभरात नाव कमावले.

Leave a Reply

Your email address will not be published.