आपणास माहिती आहेत का, रेखापासून शिल्पा शेट्टीपर्यंत अभिनेत्रींची खरी नावे. पडद्यावर वेगळी आणि घरी वेगळी आहेत या अभिनेत्री ची नावे

“नाव काय आहे” या जुन्या किस्साचे आपण अनुसरण करीत असताना बॉलिवूडमधील कलाकार आणि पात्रांनी हे सिद्ध केले की ते नाव महत्त्वाचे आहे आणि ही एक महत्त्वाची बाब आहे. बॉलिवूड स्टार्सनी नावे बदलण्याचा निर्णय घेतल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत असे कलाकार भरले आहेत जे रंगमंचासाठी वेगळे नाव वापरण्यास प्राधान्य देतात. बरेच लोक विश्वास ठेवतात की त्यांचे नाव त्यांच्या अनुयायांशी अधिक चांगले कनेक्ट होते.

नवीन नावे ठेवण्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. नवीन ओळख निर्माण करण्यासाठी, मोठे नाव लहान करण्यासाठी किव्वा काही संख्याशास्त्रीय हेतूसाठी नावे बदलली जातात. चला बॉलिवूड अभिनेत्रींची यादी पाहूया ज्यांनी रील नावे स्वीकारून बॉलिवूडमधे नवीन ओळख मिळविली.

या यादीतील पहिले नाव आहे बॉलीवूडमधील सर्वांत सुंदर तसंच लोकप्रिय अभिनेत्री रेखाचं, जी अजूनही तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावत आहे. आजही रेखावर तिचे चाहते तेवढेच प्रेम करतात जितके तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या युगात करत होते. आजही तिच्या अभिनयशैली आणि सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. आजही संपूर्ण जग रेखाला ‘रेखा’ या नावाने ओळखते, पण तिचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे.

बॉलिवूडची ‘धडकन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. चित्रपटांत येण्यापूर्वी या अभिनेत्रीने तिचे नाव बदलले होते आणि तिचे खरे नाव “अश्विनी शेट्टी” होते. नंतर ती अश्विनी शेट्टी ची शिल्पा शेट्टी बनली आणि त्याच नावाने तिला बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्धीही मिळाली.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिचे खरे नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आलिया आडवाणी असे तिचे खरे नाव आहे, जिने तिचे मनमोहक आणि स्टाइलिश फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. तिचे चाहतेही खूप आहेत आणि सोशल मीडिया वर फॉलोवर्सपण. चित्रपटात आल्यानंतर सलमान खानने तिला आपले नाव बदलण्याचा पर्याय सुचवला होता.

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणजेच प्रीती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात जाहिरातींमध्ये काम करून केली होती. प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये बराच काळ घालवला आणि अनेक हिट आणि लोकप्रिय चित्रपट दिले. यानंतर तीने परदेशी प्रियकर गुडइनफशी गुपचुपरित्या विवाह केला. प्रीती झिंटाचे खरे नाव प्रीतम सिंग होते आणि तिने तिचे नाव बदलून प्रीती झिंटा केले.

दक्षिण आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. जरी त्या आज या जगात नाही, परंतु त्यांचे चाहते अद्यापही काही खास प्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. श्रीदेवीसारखी अभिनेत्री कोणत्याही एका युगाची नसून ती युगोंयुग, शतकानुशतकं लक्षात ठेवली जाते. अश्याच या गोड अभिनेत्रीचे म्हणजेच श्रीदेवीचे खरे नाव होते ‘यम्मा यंगर अय्यप्पन’.

Leave a Reply

Your email address will not be published.