ऐश्वर्या रायचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा जणांशी होते प्रेमसंबंध, अभिषेक बच्चनशी लग्न करून सर्वांना केले बाय बाय…!

बॉलिवूड फिल्म अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची चित्रपट कारकीर्द खूपच छान राहिलेली आहे. ऐश्वर्या राय ही भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि हाय प्रोफाइल सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. आत्तापर्यंत ऐश्वर्या रायने आपल्या सौंदर्य आणि उत्तम अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.आपल्या सर्वांना माहितच आहे की ऐश्वर्या राय ही “बच्चन कुटुंबिय” यांची सून आहे. ऐश्वर्या रायचे अभिषेक बच्चनशी लग्न हे भारतातील एक हाय प्रोफाइल लग्न होते ज्यात केवळ जवळच्याच काही लोकांना आमंत्रित केले गेले होते.

त्यांचे लग्न सर्व विधिपूर्वक चालीरितींनी सम्पन्न झालेले.आपल्या सर्वांना हे चांगलेच माहिती आहे की अभिषेक बच्चन हे ऐश्वर्या रायच्या आयुष्यात येणारे पाहिले प्रेम नाही. ऐश्वर्या रायची बॉलिवूड इंडस्ट्रीतील दबंग अभिनेता सलमान खानसोबतची प्रेमकथा काही काळापूर्वी खूपच चर्चेत होती परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले पण ऐश्वर्या आणि सलमानच्या प्रेमाच्या कहाण्या आजही ऐकवल्या जातात आणि मनोरंजकपणे ऐकल्याही जातात.

पाहायला गेलं तर सलमान देखील ऐश्वर्याच पहिल प्रेम नाही. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे कोणाकोणाचे हृदय ऐश्वर्या रायसाठी धडधडले त्याबद्दल माहिती देणार आहोत. ऐश्वर्या रायच्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती राजीव मूलचंदानी होती. जेव्हा ऐश्वर्या राय मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती, त्याचवेळी राजीव मूलचंदानी तिच्या आयुष्यात आला. हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढू लागली होती, पण जेव्हा ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा ती राजीव मूलचंदानीपासून दूर झाली.

त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. काही काळासाठी ऐश्वर्या रायचे नाव फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदीशीही जोडले गेले होते. आपल्याला सांगू शकतो की जेव्हा ऐश्वर्या रायने डोक्यावर मिस वर्ल्डचा मुकुट घातला होता, त्यावेळी ऐश्वर्याने हेमंत त्रिवेदीने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. अक्षय खन्ना चे हृदय ही ह्या अभिनेत्रीवर आल्यावाचून राहिले नाही!

बातमीनुसार असे म्हटले जाते की “आ अब लौट चले” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या यांनी ‘ताल’ या चित्रपटातही एकत्र काम केले होते. असे म्हणतात की सलमान खानसाठी ऐश्वर्या रायने अक्षय खन्नाला तिच्या आयुष्यातून दूर केले होते. एक काळ असा होता की सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. एवढेच नाही तर एकत्र जगण्या-मरण्याचे वचनही एकमेकांना दिले होते.

या दोघांच्या प्रेमाची सुरूवात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. त्या दिवसांत या दोघांची प्रेमकहाणी चर्चेत होती. प्रत्येकाला असे वाटत होते की ऐश्वर्या आणि सलमान चे प्रेम हे लग्नगाठी पर्यंत पोहोचणार पण नशीब काहीतरी वेगळंच होतं. सलमान खानच्या तऱ्हेहीत वागण्यामुळे ऐश्वर्या रायने शेवटी कंटाळून त्याच्यासोबत ब्रेकअप केलं होत.

अभिनेता विवेक ओबेरॉयशीही ऐश्वर्या रायचे नाव जोडले गेले आहे. असे म्हणतात की विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या एकमेकांबद्दल बरेच गंभीर होते. काही काळासाठी या दोघांची प्रेमकथा एक आकर्षणाचा विषय होती. सलमान खानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या पूर्णपणे तुटून गेलेली. त्यानंतर विवेक ओबेरॉय ने तिला मानसिक आधार दिलेला तिचे समर्थन केलेले.

“क्यों हो गया ना” या चित्रपटाच्या दरम्यान विवेक आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले आणि हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढू लागली. विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या पूर्णपणे प्रेमात पडला. बातमीनुसार असे म्हणतात की विवेक ओबेरॉय यांना सलमान खानचे धमकीचे फोन येत असत त्यानंतर विवेक ओबेरॉय यांनी एका पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात विधान केले होते.

या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्या राय विवेकपासून दूर गेली होती आणि शेवटी त्यांचे संबंध तुटले. आपल्याला सांगू शकतो की शेवटी ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. या दोघांना आराध्या नावाची एक छान, सुंदर मुलगी आहे. आराध्या तिच्या क्यूटनेसमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.