अभिनेता संजय दत्त अनेकदा आपल्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत राहीलेला कलाकार आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे नाव त्याच्याशी जोडले गेले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात ३०८ प्रेयसी होत्या असे म्हटले जाते, जे ‘संजू’ या त्याच्या बायोपिक चित्रपटात उघडकीस आले आहे. त्यातील काही प्रेमप्रकरण बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापर्यंत चर्चेत राहिली होती. टीना मुनीम ते माधुरी दीक्षित यांच्यासोबतचे त्यांचे प्रकरण आजही चर्चेत आहे.
तथापि अजूनही बर्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते. आम्ही बोलतोय विश्वसुंदरी सुष्मिता सेन बद्दल! सुष्मिता सेन आणि संजय दत्तच्या प्रेम प्रकरणाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. दोघांची भेट कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर नव्हे तर एका स्टेज शो दरम्यान झाली होती. सुष्मिताला पाहिल्यानंतर संजय पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षित झाला. असे म्हटले जाते की हे दोघे एक-दोन भेटीनंतर लगेचच एकमेकांच्या जवळ आले.
संजय दत्त आणि सुष्मिता सेन एकमेकांना परदेशात भेटायचे. एवढेच नव्हे तर दोघेही परदेशात हॉटेलच्या एकाच खोलीत एकत्र राहत होते. मात्र, त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिला याबाबत काही माहिती नव्हती. रिया पिल्लई यांचा संजय दत्तवर पूर्ण विश्वास होता, परंतु असे असूनही त्याने ही चूक केली. असे म्हटले जाते की रिया पिल्लईने संजय दत्त आणि सुष्मिता सेन यांना एकत्र सुट्टी घालवताना पाहिले होते.
मात्र यामागे आणखी एक गोष्ट आहे, ज्यामुळे रियाला दोघांच्या अफेअरची बातमी मिळाली. एक पत्रकार सुष्मिता सेनच्या मुलाखतीसाठी हॉटेल लॉबीमध्ये थांबला होता. जेव्हा सुष्मिता आणि संजय हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा दोघांचे हात एकमेकांच्या हातात असलेले दिसले. यादरम्यान हे दोघेही खूप आनंदी दिसत होते. हे पाहून त्या पत्रकाराने ठरवलं की आपण त्या दोन कलाकारांच्या मुलाखती छापू, यासाठी तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने मुलाखत घेऊन फोटो काढण्याची विनंती करत राहिला आणि फोटो क्लिक करत राहिला.
हे पाहून संजय दत्त संतापला आणि त्याने रिपोर्टरला मारहाण केली आणि त्याचा कॅमेरा तोडला. यानंतर संजय दत्त आणि सुष्मिता सेन त्यांच्या खोलीत गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांचे फोटो वर्तमानपत्रात छापलेले होते. दुसरीकडे वर्तमानपत्रामधील दोघांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची पूर्व पत्नी रिया पिल्लई यांना त्यांच्या प्रेमसंबंधाची बातमी कळली.
संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटात त्याची सर्व प्रेमप्रकरणं सविस्तरपणे दर्शविलेले नाहीत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, किमी काटकर आणि सुष्मिता सेन यांच्यावरील त्यांच्या प्रेमसंबंधांवर चर्चा झाली नाही.
चित्रपटामध्ये फक्त टीना मुनिमचा उल्लेख आहे, जी सध्या अनिल अंबानीची पत्नी आहे. याशिवाय त्यांची सध्याची पत्नी मान्यता दत्त यांच्याबद्दल सांगितले गेले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी असा विश्वास होता की संजय दत्तची लव्ह लाईफ यात पूर्णपणे दाखविली जाईल, पण तसे झाले नाही. पण तरीही रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.