मलायका अरोरासोबत या ठिकाणी दिसला अर्जुन कपूर, मीडिया ला पाहून रागावला अर्जुन…..

२१ फेब्रुवारीला करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनली. तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पण, करीना आणि सैफ अली खान यांनी अद्याप त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव सांगितलेले नाही. करीना सध्या आपल्या मुलासह घरी आराम करत आहे. त्यांचे जवळचे मित्र अनेकदा त्यांना भेटायला येतात. रविवारी रात्री उशिरा अर्जुन कपूर देखील करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि मलाइका अरोरा यांच्यासह दाखल झाला.

असे बघण्यात आले की मलायका आणि अर्जुन एकाच कारमधुन करीनाच्या घरी पोहोचले. पण जसे ते दोघे करिनाच्या अपार्टमेंटच्या बाहेर पोहोचले तेव्हा काहीतरी घडले की अर्जुनला एक गोष्ट खटकली व त्याला राग आला. करिनाची मैत्रिणी मलाइका तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत तिच्या घरी आलेली पण एक व्यक्ती करीनाच्या घराबाहेर भिंतीवर चढताना पाहून अर्जुन अचानक रागावला.

खरं तर मलायका आणि अर्जुन कारमधून बाहेर पडून करीनाच्या घरात जात असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना पाहण्यासाठी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला जे पाहून अर्जुनाला इतका राग आला की त्याने भिंतीवर चढलेल्या माणसाला फटकारले.

अर्जुनने त्या व्यक्तीला असे काही करु नका तुम्हाला कुठेतरी दुखापत होईल असे सांगितले, पण अर्जुनच्या मान वळल्यानंतरही त्या माणसाने भिंतीवरुन खाली येण्यास नकार दिला. मग जेव्हा अर्जुन त्याच्या जवळ जाऊ लागला तेव्हा तो त्यांना पाहून पळून गेला.

अर्जुन त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा समजवत होता पण तो व्यक्ती त्यांचे ऐकण्यास तयार नव्हता. मग अर्जुन त्या व्यक्तीवर ओरडला. या दरम्यान मलायका अर्जुनच्या पाटोपाठ येत होती. यावेळी अर्जुनने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केले होते. त्याच वेळी सुरक्षेसाठी त्याने चेहेऱ्यावर काळा कपडा बांधला होता. रात्रीदेखील तो गॉगल लावून होता.

करिश्मा कपूरसुद्धा लहान बहिण करीना आणि पुतण्याला भेटायला पोहोचली. यावेळी करिश्मा यांनी छायाचित्रकारांसमोर हात वर करून त्यांना पोज दिली. तसेच अमृता अरोराही पती शकील, मुलगी आणि दोन्ही मुलांसमवेत करीनाच्या घराबाहेर दिसली. त्याच वेळी मलायका अरोरा आपल्या पुतण्याला घेऊन होती, व तिने पुतण्यासोबत फोटोग्राफरना पोज दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.