एकेकाळी करत होता वॉचमनचे काम त्यानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं, बॉलीवूड मधील सर्वात मोठा विलेन…!

डॅनी यांचे खरे नाव शेरिंग फिंटसो डेंगजोंग्पा असे आहे. यांचे नाव उच्चारण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागत असे व ते नाव पटकन उच्चारता येत नसल्यामुळे जया बच्चन यांनी त्यांचे नामकरण डॅनी असे ठेवले. डॅनी यांना सुरवातीच्या काळात जया बच्चन यांनी खुप सहकार्य केले असे ते स्वत: सांगतात. डॅनी जेव्हा बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये कामानिमित्त आले व कामाचा शोध घेऊ लागले तेव्हा त्यांना एका प्रोड्युसरने चक्क तुझा चेहरा हा एखाद्या वॉचमन सारखा आहे तुला वॉचमनचा जॉब देतो असे म्हटले होते.

मात्र डॅनी यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवुडमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. मागच्या वर्षी मणिकर्णिका या चित्रपटात कंगणा रनौतसोबत डॅनी काम करताना दिसले होते. डॅनीने अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्य‍ भूमिका निभावल्य‍ा आहेत. १९९० च्य‍ा दशकात बॉलीवूडच्या नावाजलेले अभिनेत्यांच्या यादीमध्ये डॅनीचे नाव घेतले जात असे. डॅनीने निभावलेल्या खलनायकाच्या भूमिका खूपच गाजल्या. डॅनीने वेगवेगळ्य‍ा प्रकारचे अनेक रोल व व्यक्तिछटा बॉलीवूड चित्रपटांमध्ये निभावल्य‍ा आहेत.

डॅनीला व्हायचे होते आर्मी पर्सन-
वास्तवत: डॅनीला आर्मीमध्ये भरती व्हायचे होते व देशसेवा करायची होती. मात्र त्यांच्या आईने यासाठी डॅनीला साफ नकार दिला व सांगितले की तू आर्टिस्टिक फिल्डमध्ये काम कर. आईचे म्हणणे ऐकत डॅनी यांनी बॉलीवूडकडे मोर्चा वळवला व बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक व प्रोड्युसर यांच्याकडे रिक्वेस्ट केल्या.

एका प्रसिद्ध प्रोडूसरने डॅनी यांना तोंडावर तु वॉचमन सारखा दिसतो तुला वॉचमनचे काम देतो व तुला जो कोणी हिरो बनवेल तेव्हा मी माझे नाव बदलेल असे बोलून अपमान केला होता. मात्र त्यांनी आपल्या दमदार अभिनय व पर्सनॅलिटीमुळे आपले नाव बॉलीवूडमध्ये गाजवले. भारत सरकारने डॅनी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत देखील केले आहे.

डॅनी व परवीन बाबी यांची लव स्टोरी 1990 च्या दशकामध्ये डॅनी व परवीन बाबी यांची लव स्टोरी बॉलीवूडमधील फेमस लव स्टोरी म्हणून ओळखली जायची. डॅनी व परवीन हे एकमेकांसोबत चार वर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये देखील राहत होते. डॅनी व परविन यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते असे म्हटले जाते.

डॅनी व परवीन बाबी यांच्या प्रेमाच्या बातम्या कायमच बॉलिवूडमध्ये त्याकाळी चर्चेचा विषय असत. मात्र काही कारणामुळे डॅनी व परवीन बाबी यांनी लग्न केले नाही. 1990मध्ये डॅनी यांनी सिक्किमची राजकुमारी हिच्याशी विवाह केला. आपल्या ब्रेक-अपनंतर देखील डॅनी व परवीन बाबी यांची मैत्री देखील चर्चेचा विषय असायची. प्रेम संबंध संपले असले तरी त्यांची मैत्री देखील खुप घट्ट होती.

25 फेब्रुवारी रोजी डॅनी डेंजोग्पा यांनी आपल्या वयाचा 73 वा वाढदिवस साजरा केला आहे. एकेकाळचा बॉलिवूडमधील खलनायकाचा प्रसिद्ध चेहरा म्हणजेच डॅनी. चित्रपटामध्ये हिरो कोणीही असो मात्र खलनायक फक्त डॅनीचा असायचा. आपल्या भाषेचा ठहराव आणि बोली व व्यक्तिमत्त्वामुळे थेटरमध्ये वातावरण तंग व्हायचे व प्रेक्षक वास्तविक जीवनात देखील डॅनीला घाबरायचे. डॅनीने चित्रपटात अनेक चांगल्या भूमिका देखील केल्या आहेत. मात्र त्यांनी निभावलेल्या खलनायकाच्या भूमिका या अजरामर झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.