आलिया भटचा नवीन चित्रपट गंगुबाई काठीयावाडी मधील आलियाचा वे’श्येचा रोल बघून, शाहरुख खानने दिली अशी प्रतिक्रिया…

बॉलीवुडची चुलबुली गर्ल असलेली आलिया भट्ट चित्रपटातल्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असते. आलिया भट आपल्या ॲक्टींगच्या कौशल्याने अगदी सुंदर प्रकारे प्रत्येक भूमिका वटवते. बर्‍याचशा बायोपिकमधून आलिया भट्टने आपल्या अभिनया कौशल्य प्रेक्षकांना सिद्ध करुन दाखवले आहे. राजी या चित्रपटातून आलिया भट्टने केलेली भारतीय स्त्री गुप्तहेराची भूमिका अतिशय गाजली व हा बायोपिक सुपर डुपर हिट ठरला होता.

मागच्या वर्षापासून आलिया भट्ट तिच्या आगामी बायोपिक चित्रपट गंगुबाई काठीयावाडीकरता मेहनत घेत होती. या चित्रपटाचे शू’टिंग आता संपले असून संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या जन्म दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारीला या बायोपिकचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. आलिया भट्टने या चित्रपटांमध्ये प्रमुख पात्र म्हणजेच गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील डायलॉग व आलियाचा हटके व द’बं’ग डॅशिंग गंगुबाई काठियावाडीवाला लूक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अतिशय सुंदर व्यक्तिरेखा साकारतान या चित्रपटामध्ये आपल्याला आलिया भट्ट पाहायला भेटणार आहे. आलियाने पांढरी साडी, केसांच‍ा अंबाड‍, मोगर्‍याचा गजरा, डोक्याला मोठी लाल टिकली लावलेली आहे.हा चित्रपट वे’श्या व्यवसाय करणाऱ्या गंगुबाई ज्यांनी १९६०-७० च्या काळचा मुंबईचा सगळ्यात मोठा डॉ’न व गँ’गस्’ट’र असलेल्या करीम लाला याला राखी बांधुन भाऊ बनवले होते. गंगुबाई यांच्याविरुद्ध मुंबईत काही करण्याची कोणाला डेरिंग होत नसे इतक्य‍ा गंगुबाई डॅशिंग होत्या.

गंगुबाई काठियावाड या मुळच्या गुजरातच्या काठियावाडी प्रांतातल्या होत्या. त्यांना अगदी कमी वयामध्ये त्यांच्या पतीने कोठ्यावर नेवुन विकले होते. त्यांचा जगण्याचा दृष्टीकोण, त्यांच्यातील निडरपणा व हिम्मत या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. गंगुबाई काठियावाडी यांनी कधीही कोणत्याही वे’श्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलेला त्यांच्या मनाविरुद्ध काम करण्याची बळजबरी करण्याचा अन्याय होऊ दिला नाही. एकेकाळी गंगुबाई काठीयावाडी या त्यांच्या क्षेत्रातून निवडणुकीमध्ये निवडून देखील आल्या होत्या.

एकूणच गंगुबाई काठीयावाडी यांचे व्यक्तिमत्त्व आलिया भट्टने छान साकारले आहे. आलिया भट्टच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाहरुख खानने आलिया भट्टचे खूप कौतुक केले आहे व तिच्या भूमिकेचा आणि तिने निभावलेल्या कॅरेक्टरचे कौतुक करत शाहरुख खानने “तू अतिशय डे’रिंगबाज व गँ’ग’स्ट’र दिसत आहे व तुला चित्रपटा करता खूप खूप प्रेम व शुभेच्छा” असे ट्विट केले आहे. हा चित्रपट येत्या ३० जुलै २०२१मध्ये रिलीज होणार आहे अशी बातमी आहे.

मागच्या वर्षी आलिया भट्टचा सडक२ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. मात्र लॉकडाउनच्या काळात हा चित्रपट खास जम बसवु शकला नाही. आगामी चित्रपट ब्रम्ह‍ास्त्रमध्ये आलिया भट्ट रणबीर कपुरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published.