करीनाच्या बाळाला पाहायला आली करीनाची सावत्र मुलगी सारा अली खान! आपल्या सावत्र भावासाठी आणले हे गिफ्ट…

मागच्या 21 फेब्रुवारी रोजी करीना कपूर- खान हिने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. करीनाचे हे दुसरे बाळंतपण होते व तिला यावेळी देखील मुलगा झाला आहे. 20 तारखेला करीना कपूर-खान बीच कँडी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीकरता दाखल झाली होती. 21 तारखेला तैमुरला लहान भाऊ आला अशी बातमी सोशल मिडिया व टी.वी माध्यमांमध्ये पब्लिश झाली.

करीना व सैफ अली खान यांचा पहिला मुलगा तैमुर अली खान हा देखील कायम मीडिया व इंडस्ट्रीमध्ये बातम्यांमध्ये झळकत असतो. 2016 साली करीनाने तैमुरला जन्म दिला होता. तैमुरचा लुक व क्युटनेस अगदी सेलेब्रिटीज सारखाच आहे. तैमुरचे एवढ्या लहान वयात करोडो फॅन्स आहेत. जगभरात टॉप फॅन फॉलोवर ग्रुपमध्ये तैमुर आताच जाऊन बसलाय! आता तैमुरला लहान भाऊ आला म्हटल्यावर छोटे नवाब पण खुप खुश पाहायला मिळाले.

करीना व सैफ अली खान यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. नवाब पतौडी यांच्या घरी पुन्हा एकदा छोटे नवाब जन्माला आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही! बॉलीवूड सेलिब्रिटीज तसेच मोठ-मोठे बिझनेसमन यांनी स्वत: करीना व सैफच्या घरी जाऊन करीना व नवीन पाहुण्याला शुभेच्छा व गिफ्ट देताना दिसुन येत आहेत. करीना व सैफच्या घरी गेलेल्या अनेक लोकांचे नवनवीन व्हिडिओ रोजच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नुकताच सोशल मीडियावर एक विडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये करीनाच्या बाळाला बघायला त्याची मोठी बहिण म्हणजेच सैफ व अमृता यांची कन्या सारा अली खानही मागे राहिली नाही! साराने आपल्या छोट्या भावाला व करीनाला भेट दिली व नवीन बाळाकरता ती खुप सारे गिफ्ट घेऊन गेली होती.

हिरव्या रंगाच्या हाफ जम्पसुटमध्ये सारा अली खान तोंडाला मास्क लावून आपल्या लहान भावाला पाहायला गेली होती. साराने आपल्या सोबत खूप सारे गिफ्ट नेले होते त्यातील एक गिफ्ट खूपच मोठे होते. करीना व बाळाला भेटून आल्यानंतर साराने याबद्दल बाबतची माहिती वृत्तवाहिन्यांना देखील बोलुन दिली व करीना व सैफ अब्बुजानचे तिने अभिनंदन केले.

सारा अली खान व करीना कपूर-खान या नात्यांमध्ये एकमेकीच्या सावत्र मायलेकी असल्या तरी यांच्यातील पर्सनल रिलेशन अतिशय चांगले आहे. असे म्हटले जाते की सारा व करीना यांच्यामध्ये चांगली मैत्री व गट्टी देखील आहे. नात्यामध्ये एकमेकांच्या सावत्र मायलेकी असल्या तरी यांच्यातले ट्युनिंग सगळी इंडस्ट्री पाहते.

करीबा कपुर बरेचदा साराला सल्ले देते व सारा देखील ते सल्ले अगदी सहज ऐकते असे बरेचदा साराने सांगितले आहे. सावत्र आई असली तरी करीना व सारा यांच्यात दुस्वास किंवा कटूपणा नाही ही आश्चर्याची बाब सगळ्यांनाच वाटते.याचमुळे साराने करीनाला मुलगा झाल्यानंतर स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन त्यांना गिफ्ट व शुभेच्छा दिल्या. साराचा हा व्हिडिओ काही काळातच सगळीकडे व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.